India Reply to China: चीननं अरुणाचल प्रदेशातील नाव बदलली; भारतानं म्हटलं, चीनचा मुर्खपणा...

चीननं अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांचं नामकरण सुरु केलं आहे.
China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been released
China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been releasedsakal
Updated on

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नाव बदलण्याचा अतिरेकीपणा चीननं कायम ठेवला असून काल ३० ठिकाणांची चौथी यादी चीनकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर आता भारतानं यावर प्रतिक्रिया दिली असून चीननं आपला हा मूर्खपणा कायम ठेवला असून हा मूर्खपणा भारत हे कदापी खपवून घेणार नाही, असं भारतानं चीनला खडसावलं आहे. (India Reply to China for changed name of Arunachal Pradesh areas India said it is China stupidity)

China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been released
Harassment: प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ! इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

भारताचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी म्हटलं की, "भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यातील ठिकाणांचं नामांतर करण्याचे मूर्खपणाचे प्रयत्न चीननं कायम ठेवले असून आम्ही या प्रयत्नांचा ठामपणे विरोध करतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे वास्तव बदलणार नाही" (Latest Marathi News)

China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been released
ShivSena: शिवसेनेचे दोन उमेदवार बदलणार?; संजय शिरसाटांचे सुतोवाच

चीननं यापूर्वीही बदलली होती नावं

चीनकडून या भागातील नाव बदलणारी पहिली यादी सन २०१७ मध्ये आणली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ जागांच्या नामकरणाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ११ जागांची यादी तर आता २०२४ मध्ये ३० जागांची नाव बदलल्याची यादी जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.