देशात कोरोनाचा कहर! दर तासाला 160 हून अधिक रुग्णांचा मृत्यू

आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात १८ लाख २६ हजार ४९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
Covid-19 Hospital
Covid-19 HospitalGoogle file photo
Updated on
Summary

आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात १८ लाख २६ हजार ४९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Fight with Corona : नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी (Covid-19 patient) ४ लाखाचा आकडा ओलांडला आहे. चार लाखाचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या २४ तासात देशभरात ४ लाख १४ हजार १८८ इतके नवे रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी (ता.६) दिवसभरात ३ हजार ९१५ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (India reports 414188 new covid-19 cases in last 24 hours)

Covid-19 Hospital
पूर्ण लॉकडाउनचा विचार करा; राज्य सरकारला हायकोर्टाच्या सूचना

देशभरात आतापर्यंत २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच २ लाख ३४ हजार ८३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशभरात ३६ लाख ४५ हजार १६४ सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात १८ लाख २६ हजार ४९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतात २९ कोटी ८६ लाख १ हजार ६९९ जणांची कोरोना चाचणी केली आहे, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिली आहे.

Covid-19 Hospital
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

दरम्यान, गुरुवारी देशभरात ३ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि लवकरच चार हजारचा आकडाही ओलांडेल अशी स्थिती आहे. गुरुवारी दर तासाला १६० हून अधिक जण मृत्युमुखी पडत होते. ही आकडेवारी मनात धडकी भरवणारी आहे. आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याने तसेच अनेकांना वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यानेही जीव गमवावा लागत आहे.

Covid-19 Hospital
Breaking : स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे गुरुवारी दिसून आले. गेल्या २४ तासात राज्यात ६२ हजार १९४ नवे रुग्ण आढळले. तर ८५३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ७३ हजार ५१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४९ लाख ४२ हजार ७३६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी आणखी ४ हजार ५५४ जणांची भर पडली. पण मृत्यू संख्येत घट झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()