भारतात एमपॉक्स (मंकीपॉक्स)चा पहिलाच संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. मंकीपॉक्स संक्रमणाच्या केसेस आढळत असलेल्या देशातून नुकतेच प्रवास केलेला एक तरुण हा मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी याबद्दल माहिती दिली आहे. या रुग्णाला सध्या रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.