वादग्रस्त वक्तव्यानंतर संतापलेल्या कतारला भारताने दिले उत्तर; म्हणाले...

India responds to angry Qatar
India responds to angry QatarIndia responds to angry Qatar
Updated on

नवी दिल्ली : भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा (Controversial statement) जगभरातून निषेध होत आहे. कतारने भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना बोलावून भारताना माफी मागावी, असे म्हटले होते. अल्पसंख्याकांवरील विवादास्पद टिप्पणी ही सरकारची नसून सीमावर्ती घटकांची मते आहेत, असे भारताने (India) कतारला (Qatar) कळवले आहे. (India responds to angry Qatar)

भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हे कतार दौऱ्यावर आहे. या घडामोडीवर दोहा येथील भारतीय दूतावासाने निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, कतारच्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात भारताच्या (India) बाजूने हे स्पष्ट करण्यात आले आहे की हे ट्विट भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंबित करीत नाहीत.

भारत सरकार विविधतेतील एकतेच्या मजबूत सांस्कृतिक परंपरेनुसार सर्व धर्मांचा सर्वोच्च आदर करते. अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर यापूर्वीच कठोर कारवाई करण्यात आली आहे. अशा खोडकर घटकांविरुद्ध एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे भारताच्या वतीने सांगण्यात आले आहे.

India responds to angry Qatar
राज्यसभेवर निवडून जाण्यापूर्वी अन् गेल्यावर श्रीरामाचं दर्शन घेणार - संजय राऊत

भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी इंग्रजी टीव्ही चॅनलवरील डिबेटमध्ये मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (Controversial statement) केले होते. रविवारी भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले. कतारने वक्तव्यावर आक्षेप घेतल्यानंतर ‘अल्पसंख्याकांवरील विवादास्पद टिप्पणी ही सरकारची नसून सीमावर्ती घटकांची मते आहेत’ असे असे भारताने (India) कतारला (Qatar) कळवले आहे.

भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू शनिवारी कतारला पोहोचले. रविवारी त्यांनी कतारचे पंतप्रधान आणि अंतर्गत मंत्री शेख खालिद बिन खलिफा बिन अब्दुलाझीझ अल सानी यांची येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली आणि व्यापार, गुंतवणूक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. ३० मे ते ७ जून या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात उपराष्ट्रपती अरब देशात पोहोचले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()