Richest Politician: देशातील सर्वात श्रीमंत नेत्यांची यादी जाहीर, कोणाकडे आहे सर्वात जास्त संपत्ती आणि कोण सर्वात गरीब?

भारतातील काही नेत्यांकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.
India Richest Politician List
India Richest Politician ListSakal
Updated on

India Richest Politician List 2023: भारतातील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत केवळ उद्योगपतीच नाही तर अनेक नेत्यांचाही यात समावेश आहे. भारतातील काही नेत्यांकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 4001 जागांच्या आमदारांच्या संपत्तीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

कोणत्या नेत्याकडे आहे सर्वाधिक संपत्ती?

एडीआरच्या अहवालानुसार कर्नाटकचे नेते डीके शिवकुमार यांच्याकडे भारतात सर्वाधिक संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे आणि ते भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत.

तर पश्चिम बंगालमधील भाजप आमदाराची सर्वात कमी संपत्ती 1,700 रुपये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी चार काँग्रेसचे, तर तीन भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आहेत.

'या' नेत्यांकडे सर्वाधिक संपत्ती आहे

कर्नाटकातील कनकपुरा येथील आमदार काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांची एकूण संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटकातील गौरीबिदानूर येथील आमदार केएच पुट्टास्वामी गौडा यांची संपत्ती 1,267 कोटी रुपये आहे.

कर्नाटकातील गोविंदराजनगरचे आमदार आणि काँग्रेस नेते प्रियकृष्ण यांची संपत्ती 1,156 कोटी रुपये आहे. तेलगू देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे कुप्पमचे आमदार एन चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 668 कोटी आहे.

गुजरातमधील मानसाचे आमदार आणि भाजप नेते जयंतभाई सोमभाई पटेल यांची संपत्ती 661 कोटी रुपये आहे. कर्नाटकचे हेब्बल आमदार आणि काँग्रेस नेते सुरेश बीएस यांची संपत्ती 648 कोटी रुपये आहे. YSRCP पक्षाचे नेते आणि पुलिवेंदुला, आंध्र प्रदेशचे आमदार वायएस जगनमोहन रेड्डी यांची संपत्ती 510 कोटी रुपये आहे.

भाजप नेते आणि महाराष्ट्राचे घाटकोपर पूर्व आमदार पराग शहा यांची संपत्ती 500 कोटी रुपये आहे. काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे आमदार टीएस बाबा यांच्याकडे 500 कोटींची संपत्ती आहे. मंगलप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 441 कोटी आहे, ते महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आहेत.

किमान मालमत्ता असलेले आमदार

पश्चिम बंगालचे सिंधूचे आमदार आणि भाजप नेते निर्मल कुमार धारा यांची सर्वात कमी संपत्ती फक्त 1,700 रुपये आहे. ओडिशातील रायगडा येथील आमदार मकरंदा मुदुली यांची एकूण संपत्ती 15,000 रुपये आहे.

पंजाबचे फाजिल्का आमदार आणि आम आदमी पक्षाचे नेते नरिंदर पाल सिंग सावना यांची एकूण संपत्ती 18,370 रुपये आहे. पंजाबच्या संगरूरच्या आमदार आणि आप नेत्या नरिंदर कौर भाराज यांची एकूण संपत्ती 24,409 रुपये आहे.

India Richest Politician List
Rahul Gandhi Defamation Case : सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना बजावली नोटीस; राहुल गांधींना दिलासा?

झारखंडचे जुगसलाईचे आमदार आणि JMM नेते मंगल कालिंदी यांची एकूण संपत्ती 30,000 रुपये आहे. पश्चिम बंगालमधील नवद्वीपचे आमदार आणि एआयटीसीचे नेते पुंडरीकाक्ष्य साहा यांची एकूण संपत्ती 30,423 रुपये आहे.

काँग्रेस नेते आणि छत्तीसगडमधील चंद्रपूरचे आमदार राम कुमार यादव यांची एकूण संपत्ती 30,464 रुपये आहे. सपा नेते आणि उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील आमदार अनिल प्रधान यांची एकूण संपत्ती 30,496 रुपये आहे.

भाजप नेते आणि मध्य प्रदेशातील आमदार राम डांगोरे यांची एकूण संपत्ती 50,749 रुपये आहे. महाराष्ट्रातील आमदार विनोद भिवा निकोले यांची एकूण संपत्ती 51,082 रुपये आहे.

India Richest Politician List
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.