मुकेश अंबानी यांनी यावर्षी आतापर्यंतच्या कमाईत आघाडीवर असलेल्या सावित्री जिंदाल यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सच्या ताज्या रँकिंगमध्ये मुकेश अंबानी यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय उद्योगपतींमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी सावित्री जिंदाल अव्वल स्थानी होत्या.
सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. पोलाद उत्पादक जेएसडब्ल्यू स्टील तसेच खाणकाम, वीजनिर्मिती, औद्योगिक वायू आणि बंदर सुविधांशी संबंधित कंपन्यांमध्ये नवी दिल्लीस्थित कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे.
आता मुकेश अंबानी 8.56 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह भारतात पहिल्या, शिव नादर 8.44 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या आणि सावित्री जिंदल 8.44 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. इलॉन मस्क 2023 मध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. मस्क यांनी या वर्षी आतापर्यंत आपल्या संपत्तीत 96.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (mukesh ambani) ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्समध्ये 13 व्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 95.7 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे त्यांच्या नेटवर्थवरही परिणाम झाला आणि त्यांच्या संपत्तीत 1.30 अब्ज डॉलरची वाढ झाली. दुसरीकडे सावित्री जिंदल यांच्या संपत्तीत गुरुवारी केवळ 256 मीलियन डॉलरची वाढ झाली. तर, शिव नादर यांच्या संपत्तीत 385 मिलीयन डॉलरची घट झाली आहे.
इलॉन मस्क (Elon Musk) आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या यंदाच्या कमाईत देखील भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. इलॉन मस्क यांची संपत्ती या वर्षी 96.3 अब्ज डॉलरने वाढून 223 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत 82.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आता त्यांच्याकडे 128 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
याशिवाय जेफ बेजोस यांनी या वर्षी आतापर्यंत 71.5 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. स्टीव्ह बाल्मर यांनी 44.10 अब्ज डॉलर, लॅरी पेज यांनी 43.8 अब्ज डॉलर आणि सर्गेई ब्रिन यांनी 40.9 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. हे सर्व अब्जाधीश अमेरिकेतील आहेत.
संपत्ती गमावण्यात अदानी जगात अव्वल
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यावर्षी संपत्ती गमावण्याच्या बाबतीत जगातील अब्जाधीशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची संपत्ती 120 अब्ज डॉलर होती, जी आज 82.4 अब्ज डॉलर होती. या वर्षी आतापर्यंत अदानीला 38.1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. गुरुवारी त्यांच्या संपत्तीत 1.28 अब्ज डॉलरची वाढ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.