India Set To Ban Sugar Exports For First Time In 7 Years
नवी दिल्ली- ऑक्टोबर महिन्यात भारत सरकार साखरेवर निर्यातबंदी लादण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतावर अशी वेळ येणार आहे. कमी पावसामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे सरकार साखर बंदीचा निर्णय घेणार असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारतात साखर निर्यात बंदी असं थेट म्हणता येणार नाही. कारण ऑटोमॅटिक निर्यात थांबली आहे. साखर निर्यात बंदी म्हटलं की त्याचा फायदा आपल्या स्पर्धक देशांना होऊ शकतो, असं नाईकनवरे म्हणाले. ३० सप्टेंबरपर्यंतचे सरकारचे नोटिफिकेशन आहे. त्याला मुदतवाढ दिली नाही तर आम्ही ती मागू, असंही ते म्हणाले.
जानेवारी 2024 पर्यंत किती उत्पन्न होतंय, त्याची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर आम्ही केंद्राकडे प्रस्ताव घेऊन जाऊ आणि ती परवानगी द्द्यावी अशी विनंती करणार आहोत. 61 लाख टनांचा कारखाना निहाय कोठा दिला आहे तो पूर्ण केला आहे, अशी माहिती नाईकनवरे यांनी दिली.
निर्यात होणार नाही त्यामुळे त्यातून मिळणारं उत्पन्न सरकारला मिळणार नाही. आपली साखरेची वाढ दरवर्षी जास्त आहे. पण, यावर्षी 10 लाख टनांनी साखरेचं उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळं पॅनिक होण्याची गरज नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे त्याची काळजी महाराष्ट्र आणि कर्नाटकला आहे. ती आकडेवारी समोर आली की आपल्या समोर चित्र स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.
अनेक कारखाने आणि आमची मागणी आहे की निर्यातीला परवानगी द्यावी. आपण टोमॅटो आणि कांद्याने बेजार झालो आहोत. त्यात साखरेची भर पडू नये असं नाईकनवरे म्हणाले. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणी कर्नाटक ही तीन राज्य 80 टक्के साखरेच उत्पादन करतात. जागतिक बाजारात सर्वाधिक साखरेचे उत्पन्न ब्राझील करतो. गेल्यावर्षी तिथं त्याच उत्पादन कमी झालं होतं. पण, यंदा तिथं विक्रमी साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.