जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यापूर्वी ही आकडेवारी केवळ ९ टक्के होती, परंतु या महिन्यात ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढली आहे.
Corona Updates: नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून भारतात दररोज ३ लाखापेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे भारताच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला आहे. जगातील एकूण कोरोना संक्रमित लोकांमध्ये भारताचा वाटा ३८ टक्के एवढा आहे. आणि कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या बाबतीत जगातील कोणताही देश भारताच्या आसपास नाही. सध्याच्या घडीला भारतात जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यापूर्वी ही आकडेवारी केवळ ९ टक्के होती, परंतु या महिन्यात ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढली असल्याने ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी (ता.२६) दिवसभरात देशात कोरोनाची ३ लाख २३ हजार १४४ नवीन प्रकरणे आढळली आहेत. या व्यतिरिक्त २ हजार ७७१ लोक मरण पावले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज वेगवेगळे विक्रम नोंदविले जात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ७६ लाखाच्या पुढे गेली आहे. या व्यतिरिक्त मृत्यूंची संख्याही २ लाखाचा आकडा लवकरच ओलांडेल असं दिसतंय. सरकार जाहीर करत असलेली आकडेवारी ही वास्तवापेक्षा कमी आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. कारण अनेक खेड्यांमध्ये कोरोना चाचणी मर्यादित होत आहेत, तर काही ठिकाणी अजूनही झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात चाचण्यांमध्ये वाढ होत असेल, तर येत्या काही दिवसांत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू शकते. दुसरीकडे देशात पॉझिटिव्हिटी रेटही वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिली तर कोरोना महामारी नियंत्रणात असल्याचे मानले जाईल. अमेरिकेपासून भारतापर्यंत जगातील अनेक देशांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट खूपच जास्त आहे. अमेरिकेत ७ टक्के तर भारतात तब्बल २५ टक्के आहे. या बाबतीत ब्रिटनने कमालीचे यश मिळवले आहे. आणि ही आकडेवारी ०.२ टक्के एवढी खाली आणली आहे. कासवगतीने सुरू असलेली लसीकरणाची मोहिम भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. आतापर्यंत देशात फक्त १४ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. जी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के इतकीही नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.