चेन्नई : अवकाश संशोधनामध्ये भारताने आज आणखी एक नवा अध्याय लिहिला. तमिळनाडूतील स्टार्टअप ‘स्पेसझोन इंडिया’ आणि ‘मार्टिन समूहा’ने तयार केलेल्या पहिले रियुजेबल हायब्रीड रॉकेट ‘आरएचयूएमआय-१’ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चेन्नईतील थिरुविदंडाई येथील प्रक्षेपण केंद्रावरून मोबाईल लाँचरचा वापर करून हे प्रक्षेपण करण्यात आले.