India: The Modi Question : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननं (BBC) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटातून मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला असून भारताविरोधातील हा प्रपोगंडा असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.
भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. (India the Modi Question India objects British PM Rishi Sunak take stand)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत भारताची भूमिका मांडली. बागची म्हणाले, "हा माहितीपट म्हणजे भारताविरोधात अपप्रचाराचा प्रयत्न आहे. या माहितीपटातून हे स्पष्ट होतं की, ही फिल्म बनवणारे लोक ठराविक विचारांनी प्रेरित आहेत. त्यांनी जे यातून मांडलं आहे त्यात तथ्य नाही. हा प्रकार गुलामीची मानसिकता दर्शवते. आम्हाला माहिती नाही की यामागे कसला अजेंडा आह?"
ब्रिटिश पंतप्रधानांचा विरोध
बीबीसीच्या माहितीपटावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा झाली. यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी देखील याचा विरोध केला. यावेळी पाकिस्तानी वंशाचे खासदार इमरान हुसैन यांनी म्हटलं की, गुजरातच्या दंगलींसाठी थेटपणे नरेंद्र मोदी जबाबदार होते.
अद्यापही या दंगलीतील पीडितांना न्याय मिळालेला नाही. यावेळी त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना मोदींच्या भूमिकेवर म्हणणं मांडण्यास सांगितलं.
यावर ब्रिटनचे पंतप्रधान सूनक यांनी म्हटलं की, "बीबीसीनं जो माहितीपट बनवला आहे त्याच्याशी मी आजिबात सहमत नाही. ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट आहे की, आम्ही जगाच्या कुठल्याही भागात होणारी हिंसा सहन करु सकत नाही.
पण माहितीपटात मोदींची जी प्रतिमा दाखवण्यात आली आहे, त्याच्याशी मी आजिबात सहमत नाही"
१७ जानेवारीला पहिला एपिसोड रिलीज झाला
बीबीसीकडून १७ जानेवारी रोजी 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' या माहितीपटाचा पहिला एपिसोड यूट्यूबवर रिलीज केला होता. याचा दुसरा एपिसोड २४ जानेवारीला रिलीज होणार होता. यापूर्वीच केंद्र सरकारनं पहिला एपिसोड युट्यूबवरुन हटवला आहे.
या माहितीपटात पंतप्रधान मोदी आणि मुस्लिमांमध्ये असलेल्या तणावावर नजर टाकतो. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दाव्यांची तपासणी केली आहे. या प्रकरणात चौकशी समितीनं मोदींना क्लीनचीट दिली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.