भारत २०३० पर्यंत ड्रोन हब बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ड्रोन महोत्सवा’चे उदघाटन
India to become drone hub by 2030  Prime Minister Narendra Modi
India to become drone hub by 2030 Prime Minister Narendra Modisakal
Updated on

नवी दिल्ली : ड्रोन तंत्रज्ञान हा भारतातील एका मोठ्या तांत्रिक क्रांतीचा आधार बनत असून भारत २०३० पर्यंत ‘ड्रोन हब'' बनेल तसेच रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात ड्रोन उद्योगाकडून फार मोठ्या शक्यता आहेत. शेतीपासून, प्रशासन, कायदा सुव्यवस्था व अंतरिक्ष तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रांत ड्रोनच्या फायद्यांची महती अद्भुत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. यापूर्वीच्या सरकारांनी तंत्रज्ञान ही अडचण मानल्याने देशाचे मोठे नुकसान झाले, असाही त्यांनी आरोप केला. प्रगती मैदानावर आजपासून सुरू झालेल्या पहिल्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात विविध क्षेत्रात उपयुक्त असलेल्या ड्रोनच्या १५०० निर्मात्या उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी ड्रोनचा वापर करणाऱ्या काही शेतकऱ्यांबरोबरही संवाद साधला.

ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान व याच्या फायद्यांबाबत भारतात आज जो उत्साह व ऊर्जा दिसत आहे ती आगामी काळातील या क्षेत्राच्या मोठ्या प्रगतीचे निदर्शक आहे. याचे महत्त्व तरुण पिढीला सर्वांत आधी लक्षात आले आहे. २०१४ च्या आधी प्रशासनातील याबाबत उदासीनता होती. शासकीय स्तरावरूनच अशी उदासीनता असल्याने ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष कामकाजातील वापराबाबतही उदासीनताच होती. मात्र या दृष्टिकोनामुळे सर्वांत मोठे नुकसान गरीब, वंचित व मध्यम वर्गाचे झाले. ड्रोन तंत्रज्ञानाबाबत देशवासीयांमध्ये आज जो उत्साह दिसतो आहे तो विलक्षण आहे. देशाच्या रोजगारनिर्मितीत ड्रोन उद्योग मोठी भूमिका बजावणार आहे. पंतप्रधान स्वामित्व योजनेत पहिल्यांदाच गावांतील मालमत्तांचे डिजीटल मॅपिंग करण्याची योजना आखली. त्यातही ड्रोन तंत्रज्ञानाची महत्त्वाची मदत होत आहे, असे सांगताना मोदींनी, शेतीत ड्रोनचा वापर किती फायदेशीर ठरतो हे देशातील शेतकरी प्रत्यक्ष अनुभवत आहेत, असे नमूद केले.

केदारनाथ धानच्या विकासाची योजना सुरू झाली, तेव्हा आपण दिल्लीतून ड्रोनच्या सहाय्याने या योजनेचे निरीक्षण व पाहणी करत होतो. ड्रोनद्वारे ही माहिती माझ्यापर्यंत पोचत होती व त्यांना (तेथे काम करणारे) याची माहितीही नव्हती की माझ्याकडे या प्रकल्पाची किती माहिती जमा झाली आहे. एखाद्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्यक्ष तेथेच जायला पाहिजे हे ड्रोनमुळे गरजेचे राहिलेले नाही.

महोत्सवाची वैशिष्ट्ये

  • देशातील सर्वांत मोठा ड्रोन महोत्सव.

  • देशी विदेशी १६०० सरकारी-खासगी विभाग-कंपन्यांची ७० दालने

  • ड्रोनचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या चलचित्राचे प्रदर्शन

  • ड्रोन प्रात्यक्षिके, पॅनल चर्चा व मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सीचे मॉडेल पाहण्याची संधी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.