नवी दिल्ली : देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची जागा छोट्या मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर) घेणार आहेत. शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ४० ते ५० अणुभट्ट्या विकसित करण्यात येणार असल्याचे ‘टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स’तर्फे सांगण्यात आले आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिॲक्टर (पीएचडब्लूआर) या छोट्या अणुभट्ट्यांचा ३-डी डिझाईन प्लॅटफॉर्मचा वापर करत पुन्हा आराखडा तयार केला जात आहे.