India vs Bharat : देशाच्या नावावरून संकुचित राजकारण! न्यायालयानेच दखल घ्यावी; मायावतींची भूमिका

mayawati
mayawatiesakal
Updated on

मुंबई - India vs Bharat इंडिया विरुद्ध भारत वादावरुन देशात राजकीय संघर्ष पेटला आहे. आता बहुजन समाज पक्ष आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लखनौ येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत म्हणजे इंडिया हे देशाचे सर्वांना परिचीत असलेले प्रतिष्ठित आणि घटनात्मक नाव आहे. त्यामुळे देशाच्या नावाशी छेडछाड करणे अत्यंत अन्यायकारक असल्याचं मायावती यांनी म्हटलं.

mayawati
Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! टिळक रोडवर MPSCच्या विद्यार्थ्यावर तिघांचा कोयत्याने हल्ला

प्रसारमाध्यमांशी बोलताना मायावती म्हणाल्या की, विरोधी पक्षानेच आपल्या युतीचे इंडिया हे नाव देऊन भाजपला देशाच्या नावावर संविधानाशी छेडछाड करण्याची संधी दिली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या संगनमताने सर्व काही घडत असल्याची, शक्यता मायावती यांनी व्यक्त केली.

मायावती पुढे म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी भारतविरुद्ध इंडिया असे राजकारण करण्याचा काँग्रेस आणि भाजपचा खेळ लोकांना समजतोय. यातून गरिबी, महागाई, बेरोजगारी, विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांपासून अंतर राखणे आपल्यासाठी आवश्यक आणि जनहिताचे आहे.

mayawati
Murder : 'नाकाला लावला चिमटा' अन्.. नवऱ्याशी झालेल्या वादातून आईनेच घेतले चिमुकलीचे प्राण

विरोधकांच्या आघाडीला देण्यात आलेल्या इंडिया नावाविरोधात भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात जायला हवं होतं. या प्रकरणी कायदा करून इंडिया हे नाव देण्यावर बंदी घालायला हवी होती. आता याबाबत जे संकुचित राजकारण केले जात आहे, तेही लोकविरोधी आहे. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने स्वतः याची दखल घेऊन देशाच्या नावाने खास तयार झालेल्या संघटना, पक्ष आणि आघाड्यांवर तात्काळ बंदी घालावी, अशी आमची मागणी असल्याचं मायावती यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.