India Vs Bharat: "आम्ही इंडिया आघाडीचं नाव बदलून 'इंडिया भारत' केलं तर..."; RJD खासदाराचा केंद्राला टोमणा

देशात सध्या इंडिया नाव वगळण्यावरुन बराच खल सुरु आहे.
Manoj Jha
Manoj Jha
Updated on

नवी दिल्ली : भारताचं नाव 'इंडिया म्हणजे भारत' असं असताना यातून 'इंडिया' हा शब्द वगळण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत G20 समिटदरम्यान, देशाच्या नावात काही बदलही करण्यात आले आहेत.

पण अचानक असा निर्णय घेण्यामागं विरोधकांची इंडिया आघाडी कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मोदी सरकारला टोमणा मारला आहे. (India Vs Bharat Name Controversy RJD MP Manoj Jha Counter attack on Modi govt)

मनोज झा नेमकं काय म्हणाले?

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मनोज झा म्हणाले, मी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना माझ्यासोबत संविधानाचं पठण करण्यासाठी आमंत्रित करतो. राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये देशाचं नाव स्पष्टपणे 'इंडिया दॅट इज भारत' असं म्हटलं आहे. आम्ही त्यांना १९ जुलै पूर्वी असं काहीही म्हणताना ऐकलं नव्हतं. १९ जुलै हा तोच दिवस आहे ज्या दिवशी INDIA आघाडीची स्थापना झाली होती.

Manoj Jha
INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या बैठका आता थांबणार! संजय राऊतांनी दिली मोठी अपडेट

तर तुम्ही काय करणार?

जर आम्ही आमच्या आघाडीच्या नावाचं अधिक संक्षिप्तीकरण केलं आणि आघाडीचं नाव बदलून इंडिया भारत असं केलं तर जयशंकर काय करणार आहेत? असा सवाल खासदार मनोज झा यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी थेट केंद्र सरकारला इंडिया हा शब्द वगळण्यावरुन टोमणा मारला आहे.

Manoj Jha
Parliament Session: "हे बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण"; संसदेच्या विशेष अधिवेशनावर राऊतांची सडकून टीका

जयशंकर काय म्हणाले होते?

केंद्र सरकारनं दिल्लीत होत असलेल्या G20 समिटसाठी काढण्यात आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरुन देशाचं इंडिया हे नाव हटवलं आहे. याचं समर्थन करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं होतं की, संविधानात 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख आहे. मग विरोधकांना भारत या शब्दाची काय अडचण आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.