भारताविरूद्ध चीनचा नवा डाव! हिंदी भाषा येणाऱ्यांची सैन्यदलात भरती

गेल्या दीड ते दोन वर्षापासून पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे.
India vs China
India vs ChinaSakal
Updated on

India vs China : गेल्या दीड ते दोन वर्षापासून पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे. भारतात कोंडीत पकडण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करत आहे. भारतीय सीमा ओलांडून घुसघोरीनंतर आता चीनने भारतावर नवा डाव टाकला आहे. चीन आपल्या सैन्यामध्ये हिंदी भाषा येणाऱ्या तरूणांची भरती करणार असल्याचं गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार समजतंय.

चीनच्या भारताविरोधातील कुरापती वारंवार वाढत चालल्या असून गलवान संघर्षानंतर चीनकडून आता सैन्यभरतीला वेग आला आहे. हिंदी भाषिकांची भरती चीन आपल्या सैन्यात करणार असल्याचं समोर आलं आहे. ही भारतासाठी चिंताजनक बाब असून यामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारत चीन सीमेवरील पूर्व लडाखजवळच्या सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य मागील काही दिवसांपासून अलर्ट मोडवर आहे. एकीकडे हा तणाव कमी होण्यासाठी बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे चीनच्या कुरापती वाढताना पहायला मिळत आहेत.

India vs China
चीनकडून हेरगिरी अन् डेटा चोरी; तीन चिनी नागरिकांना नोएडातून अटक

दरम्यान, चीनकडून पूर्व लडाखजवळील तिबेट आणि नेपाळमधील लोकांची भरती सुरू झाली आहे. चिनी सैन्याचे अधिकारी या भागातील शाळा आणि कॉलेजला भेटी देत असून हिंदी भाषिक तरूणांना सैन्यात भरती करण्यासाठी अवाहन करताना दिसत आहेत. या भरतीनंतर हिंदी भाषा येणाऱ्या सैन्यांना सीमेवर तैनात केलं जाऊ शकतं. ही मोहीम चीनकडून मागच्या वर्षी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. चीनच्या या कुरापतीमुळे पूर्व लडाख परिसरातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

चीनच्या कुरघोड्या काही केल्या कमी होताना दिसत नसून, आता चीनने भूतानच्या बाजूने असलेल्या डोकलाम पठाराजवळ गाव वसवल्याचे समोर आले आहे. उपग्रहाच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या फोटोतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. भारताच्या राजकीय हिताच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ही छायाचित्रे MAXAR कंपनीने काढली आहेत. त्यानंतरच्या हिंदी भाषिकांच्या सैन्य भरतीनंतर नवा वाद उभा राहू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()