India Vs Modi - पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्यायी भारतीय जनता पक्षाला देशाच्या सत्तेतुन पायउतार करण्यायाठी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या २६ विरोधी पक्षांच्या दोन बैठका सकारात्मक रित्या पार पडल्या आहेत.
विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव दिले आहे.राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार ), आणी शिवसेना (ठाकरे) हे तीन मुख्य विरोधी पक्ष या गटामध्ये सामील झाले आहेत.(india vs modi)
याचबरोबर लालूप्रसाद यादव यांचा पक्ष, नितीश कुमार यांचा पक्ष, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, अरविंद केजरीवाल यांचा पक्ष असे सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र झाले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे म्हटले जात आहे. मात्र जर राहुल गांधी नाही तर इतर कोणता राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता मोदींना भारतात तगडी फाईट देवु शकेल? हे पाहण्यासाठी सर्वे करण्यात आला आहे. एबीपी सी-व्होटरने हा सर्वे केला आहे.(C voter survey in marathi )
बिहारमध्ये सलग दोनवेळेचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वेनुसार सामील झाले आहेत.नितीश कुमार यांना १४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. राहुल गांधींशिवाय नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तगडे उमेदवार होउ शकतात असे नागरीकांचे मत आहे.(nitish kumar vs bjp )
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्या यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत त्या ममता बॅनर्जी एक तगडा चेहरा असू शकतात असे म्हटले जात आहे. ममता दीदींना १० टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाले आहे. सर्वेक्षणात १४ टक्के लोकांचा असा विश्वास आहे
सी-व्होटरने नुकताच जून महिन्यात एक सर्वे केला होता. त्यानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता देशात खूप असल्याचे पाहायला मिळाले होते. ८ टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती दर्शवली होती. (yogi and modi)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.