देश पुन्हा 'लॉक' होणार? केंद्र सरकारने दिले उत्तर

Lockdown
LockdownSakal
Updated on

दुसऱ्या लाटेनं हाहाकार (Covid second wave) माजवल्यामुळे भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. 15 दिवसांपासून दररोज तीन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. ऑक्सिजन आणि लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. अशा परिस्थिती देशात पुन्हा लॉकडाउन (Lockdown) लावणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत नीती आयोगानं (Niti Aayog)याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. नीती आयोगातील आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ( Dr VK Paul ) देशात लॉकडाउन लागणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पॉल म्हणाले की, 'कोरोना (Covid-19) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना (impose restrictions) जारी केल्या आहेत. पुढच्या काळात आणखी कडक उपाययोजनांची अथवा लॉकडाउनची गरज पडली तर त्यावर आधी चर्चा केली जाईल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.' (india will india face complete lockdown again know what the answer came from Dr VK Paul)

कोरोना महामारीचा (Covid second wave) मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले जाऊ शकतात. राज्यांना याबाबतच्या सूचनाही जारी (impose restrictions) करण्यात आल्या आहेत. वाढत्या संसर्गामुळे काही राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांच्या वाहतुकीवर बंधनं आणली जातात. यासंबंधी २९ एप्रिलला केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे तिथे रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना (impose restrictions) दिली गेली आहे. याचा निर्णय राज्य सरकारे घेतील. याशिवाय सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडा संकुल, स्विमिंग पूल आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं पॉल ( Dr VK Paul ) यांनी सांगितलं.

Lockdown
दारु प्यायल्याने कोरोना होत नाही? तज्ज्ञ सांगतात

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतच धापा टाकणाऱ्या भारताच्या आरोग्य यंत्रणेसाठी आणि देशवासियांसाठी हा तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्र सरकारचे (Central government) मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी दिला आहे. ‘ही संभाव्य तिसरी लाट कधी येईल आणि तीव्रता किती असेल, हे आज सांगू शकत नाही. मात्र आम्हाला तयारी ठेवावीच लागेल,’ असे राघवन यांनी आज स्पष्टपणे नमूद केले. दरम्यान, महाराष्ट्रासह (maharashtra) देशातील पाच राज्यांमध्ये अजूनही सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात आजही दररोज २.४% या प्रमाणात नवे रुग्ण वाढ वाढत आहेत आणि हे प्रमाण कमी झाल्याशिवाय कोरोना लाटेचा सामना करण्यास करण्याची परिस्थिती नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.