नवी दिल्ली : भारत 2023 मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे. यासंदर्भातील माहिती अंतराळ आणि पृथ्वी विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितली आहे. समांतरपणे २०२३ मध्ये भारत अंतराळात मानवी मोहीम आणि पहिली सागरी मानवी सागरी मोहीम 'गंगायान' या नावाने राबवणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली.
(India's Human Space And Ocean Mission)
जागतिक सागरी दिनानिमित्ताने दिल्लीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की. "सागरी आणि अंतराळ मानवी मोहिमेची चाचणी अंतिम टप्प्यात असून लवकरत पूर्णत्वास जाणार आहे. २०२३ मध्ये या मोहिमा राबवल्या जाणार आहेत. सागरी मोहिमेतील उथळ पाण्यातील चाचणी २०२३ च्या सुरूवातीला होणार आहे. MATSYA 6000 याद्वारे ही चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच खोल पाण्यातील सागरी मानवी माहिमेची चाचणी ही २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे." असं अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले आहेत.
गंगायान मोहिमेची एक मोहिम या वर्षीच्या दिसऱ्या टप्प्यात होणार आहे. या मोहिमेद्वारे इस्त्रोने विकसित केलेल्या मानवी रोबोट Vyomitra द्वारे अवकाशात पाठवला जाणार आहे. आणि पहिली मानवी अंतराळ मोहिम २०२३ मध्ये पार पडेल. असं ते म्हणाले.
तसेच सरकार 'निळे आर्थिक धोरण' राबवणार आहे. त्याद्वारे २०३० पर्यंत सागरी उद्योगात तब्बल ४० दशलक्ष लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. असं मंत्र्यांनी सांगितलंय.
"सरकारने जून २०२१ मध्ये खोल सागरी मोहिमेसाठी मंजूरी दिली होती. त्यासाठी ४ हजार ७७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता." अशी माहिती सिंग यांनी दिली. या मोहिमेद्वारे सागरातल्या १ हजार ते ५ हजार ५०० मीटर पर्यंतच्या खोलीतील सजीव आणि निर्जीव गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. सागरी उद्योगाला चालना मिळण्यासाठी सरकार सागरी मोहिमेसाठी आणि संशोधनासाठी प्रोत्साहन देत असं सिंग यांनी बोलताना सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.