'आत्मनिर्भर भारत'ला बूस्ट; वायुसेना देशातच बनवणार 96 लढाऊ विमाने

पंतप्रधान मोदींनी आणलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जात असून दीड लाख कोटी रुपयांच्या निधीमध्ये भारत तब्बल 114 लढाऊ विमाने बनवणार आहे.
Fighter Jet Aircraft
Fighter Jet Aircraftesakal
Updated on

नवी दिल्ली : वायु सेना लवकरच भारतीय बनावटीचे लढाऊ विमाने बनवणार आहे. पंतप्रधान मोदींनी आणलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जात असून दीड लाख कोटी रुपयांच्या निधीमध्ये भारत तब्बल 114 लढाऊ विमाने बनवणार आहे. त्यापैकी 96 लढाऊ विमाने भारतात बनवले जाणार आहेत. दरम्यान उरलेले 14 विमाने परदेशातून आयात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(India Will Make 114 Fighters Jets In 1.5 Lakh Crore)

"विदेशातून खरेदी करा आणि भारतात बनवा" या संकल्पनेतून भारतीय वायू सेनेने हा प्रकल्प राबवला आहे. त्यामध्ये भारतीय कंपन्या परदेशी विक्रेत्यासोबत करार करता येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय वायू सेनेने विदेशी ग्राहकांसोबत करार केला असून भारतात प्रकल्प राबवण्याबाबत त्यांनी चर्चा केली असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

Fighter Jet Aircraft
Muhammad Paigambar Row: वादग्रस्त पोस्टप्रकरणी बंगालमधून भाजप नेत्याला अटक

या योजनेनुसार 18 विमानांची आयात केली जाणार असून 36 विमाने देशांत बनवले जाणार आहेत. आणि दोन्ही देशांच्या चलनाद्वारे हा व्यवहार होणार असल्याचं सांगितलं आहे. आणि उर्वरित 60 विमाने ही भारतीय भागीदारीची मुख्य जबाबदारी असेल असं सांगितलं आहे. या 60 विमानाचे व्यवहार हे भारतीय चलनात होणार असल्याच सांगण्यात आलं आहे.

भारतीय चलनात पेमेंट केल्याने विक्रेत्यांना 'मेक-इन-इंडिया' प्रकल्पातील 60 टक्क्यांहून अधिक सामग्री प्राप्त करण्यास मदत होईल, असं सूत्रांनी सांगितलं. बोईंग, लॉकहीड मार्टिन, साब, मिग, इर्कुट कॉर्पोरेशन आणि डसॉल्ट एव्हिएशनसह जागतिक विमान निर्माते या निविदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.