बूस्टर डोस, १५ ते १८ वयोगटाला लसीकरण; PM मोदींनी दिले ख्रिसमस गिफ्ट

देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
pm modi
pm modiesakal
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. या घोषणा म्हणजे ख्रिसमस (Christmas) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी नागरिकांना दिलेली ही भेटच आहे. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे. (india will start corona vaccination for 15 to 18 aged children above 60 years old people and healthcare workers will get booster dose)

पंतप्रधान देशाला संबोधित करताना म्हणाले, "भारतात अनेक लोक ओमिक्रॉन व्हेरियंटने संसर्गबाधित झाले आहेत. पण लोकांनी घाबरुन जाऊ नये सावध आणि सतर्क रहावं. मास्क लावणं आणि वारंवार हात धुणं या गोष्टी कायम लक्षात ठेवा. कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या लढाईचा आजवरचा अनुभव हेच सांगतो की, व्यक्तीगत स्तरावर सर्व नियमांचं पालन करणं हेच मोठं हत्यार आहे, तसेच दुसरं हत्यार म्हणजे लसीकरण होय"

pm modi
लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा; DGCIची मान्यता

"भारतानं या वर्षी १६ जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. देशातील सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांमुळं आणि इच्छाशक्तीमुळं हे शक्य झालं. यानंतर आज भारतानं १४१ कोटी लसीचे डोस देण्याचं अभूतपूर्व आणि अवघड लक्ष्य पार केलं आहे. आज भारताच्या प्रौढ लोकसंख्येपैकी ६१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर प्रौढ लोकसंख्येपैकी ९० टक्के लोकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.

मोदींनी केलेल्या तीन मोठ्या घोषणा

  1. १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आता लसीकरण सुरु होणार आहे. सोमवार, ३ जानेवारी २०२२ पासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल.

  2. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्ससाठी Precaution Dose अर्थात बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सोमवार, १० जानेवारी २०२२ पासून या सुविधेला सुरुवात होईल.

  3. ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, लसीचा Precaution Dose (बूस्टर डोस) घेता येईल. येत्या १० जानेवारीपासून ही सुविधाही सुरु होईल.

जगातील पहिली DNA Covid लस भारतात लवकरच

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन मोठ्या घोषणांदरम्यान आणखी एक महत्वाची माहिती दिली. ती म्हणजे जगातील पहिली डीएनए कोविड लसीलाही भारतात लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच नेझल लसीवरही वेगानं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितंल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.