Ajit Doval on Subhash Chandra Bose : नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर फाळणी झाली नसती - अजित दोवाल

दोवाल म्हणाले ‘‘ गांधीजी त्यांच्या राजकीय करिअरच्या शिखरावर पोचले असताना नेताजी बाजूला झाले.
india would not have been partitioned if subhas bose was alive-said nsa ajit doval
india would not have been partitioned if subhas bose was alive-said nsa ajit dovalsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे जिवंत असते तर भारताची फाळणीच झाली नसती. नेताजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक पातळ्यांवर धाडस दाखविले. थेट महात्मा गांधींना आव्हान देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती.’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी केले. ते ‘असोचेम’च्या वतीने आयोजित पहिल्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानामध्ये बोलत होते.

दोवाल म्हणाले ‘‘ गांधीजी त्यांच्या राजकीय करिअरच्या शिखरावर पोचले असताना नेताजी बाजूला झाले. ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नव्याने संघर्ष सुरू केला. मी काही येथे कुणाला चांगले किंवा वाईट म्हणत नाही पण भारताचा आणि जगाचा इतिहास अभ्यासला असता आपल्याला एक बाब स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे फार कमी मंडळी ही लाटेच्या विरोधात गेली आहेत, असे प्रवाहाच्याविरोधात जाणे तितकेसे सोपे नसते.

नेताजी हे एकमेव असे व्यक्ती होते ज्यांना जपान सोडला तर एकाही देशाकडून पाठिंबा मिळू शकला नाही. मी स्वातंत्र्यासाठी भीक मागणार नाही तर त्यासाठी ब्रिटिशांविरोधात लढा देईल असा मनोमन निश्चय त्यांनी केला होता.

india would not have been partitioned if subhas bose was alive-said nsa ajit doval
Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या तरुणावर गोळीबार! हल्ल्यात २१ वर्षीय तरुण जखमी

स्वातंत्र्य माझा अधिकार असून तो मी मिळवायलाच हवा असे ते म्हणत होते. नेताजी असते तर त्यांनी देशाची फाळणीच होऊ दिली नसती. स्वतः बॅ. जिन्नाच म्हणाले होते, मी केवळ एकाच माणसाचा नेता म्हणून स्वीकार करू शकतो ते म्हणजे सुभाषबाबू. या देशाला केवळ राजकीय गुलामीतूनच मुक्त करण्याचा नेताजींचा इरादा नव्हता तर देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल व्हावा म्हणून त्यांची धडपड सुरू होती.’’

india would not have been partitioned if subhas bose was alive-said nsa ajit doval
Ajit Pawar : '...म्हणून सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं', अजित पवारांचा हटके खुलासा

प्रयत्नही महत्त्वाचे

माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न येतो तो म्हणजे जीवनामध्ये प्रयत्न महत्त्वाचे असतात की त्याचे फळ हे महत्त्वाचे असते. गांधीजी आणि सुभाषबाबू यांच्या प्रयत्नांवर कोणीही संशय घेऊ शकत नाही. पण बऱ्याचदा लोक तुमच्या फलिताकडे पाहून तुमचे मोजमाप करत असतात.

या दृष्टिकोनामुळे सुभाषबाबूंचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात का? असा सवालही दोवाल यांनी केला. इतिहास नेताजींबाबत क्रूरपणे वागला पण आता पंतप्रधान मोदी त्यात दुरुस्त्या करत आहेत हे पाहून मला आनंद होतो, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()