Indian Air Force Day: पाकिस्तानने भारताचे 9 एयरबेस उडवल्यानंतर 24 तासात दिलं होतं उत्तर

भारतीय वायुसेनेची ही कामगिरी सदैव अजरामर राहील
Indian Air Force Day
Indian Air Force Daysakal
Updated on

Indian Air Force Day : १९७१ हे वर्ष भारत- पाकिस्तान युद्धामुळे कायम चर्चेत राहील. बांग्लादेशच्या फाळणीपासून भारत पाकिस्तान वाद चिघळला होता. बांग्लादेशला पश्चिम पाकिस्तानपासून वेगळे करण्यात भारताने बांग्लादेशची मदत केली होती. मात्र ही गोष्ट पाकिस्तानला आवडली नाही आणि पाकिस्तान ने बांग्लादेशमध्ये कहर माजवला. भारत, सोवियत संघ, जपान, यूरोप याविरोधात होते तर अमेरिका आणि चीन यापासून खुप दूर होते.

भारताने तर ऑगस्टमध्ये सोवियत संघासोबत 20 वर्षाचे कॉपरेशन ट्रीटीवर हस्ताक्षर केले होते जेव्हा पाकिस्तानला समजले तेव्हा त्यांना कळून चुकले की बांग्लादेशला मदत करण्यासाठी आता कधीही आपल्यावर सडेतोड हमला होऊ शकतो. (Indian Air Force Day)

3 दिसेंबर 1971ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी कोलकातामध्ये एका मोठ्या रॅलीला संबोधित करत होत्या. त्या रॅलीमध्ये त्या म्हणाल्या होत्या की भारताला शांती हवी आहे. पण युद्ध करावे लागले तर भारत मागे पुढे पाहणार नाही. पण तितक्यात त्यांचे सचिव एक चिट घेऊन आले आणि त्यावर लिहिले होते की पाकिस्तानने आपल्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि पश्चिमच्या 9 एयरबेस बाँबनी उडवले. यात अमृतसर, आग्रा आणि श्रीनगरचाही समावेश होता.

इंदिरा गांधीनी लवकरच आपले भाषण संपवले आणि रॅलीतून बाहेर पडल्या. पाकिस्तान आणि भारत यांच्यात तीसरा युद्ध सुरू झाले होते. विशेष म्हणजे या युद्धाची पाकिस्तानने सुरवात केली होती.

पाकिस्तानने साडे पाच वाजता हल्ला सुरू केला होता. मात्र 9 वाजता भारतीय वायुसेनाच्या 35 स्क्वॉड्रन आणि 106 स्क्वॉड्रनच्या कैनबेरा (Canberras) फाइटर जेट पाकिस्तानमध्ये हल्ल्यासाठी तयार होत्या. याशिवाय 5वी आणि 16वी स्क्वॉड्रन सुद्धा तयार होती. भारतीय वायुसेनाने पाकिस्तानमध्ये शिरत त्यांच्या एयरबेसवर हल्ला चढवत प्रतिउत्तर दिले. 

भारतीय वायुसेनाने पाकिस्तानच्या 8 एयरबेसवर मोठा हल्ला केला एवढंच नाही तर भारतीय वायुसेनाने पाकिस्तानच्या पूर्व एयरफील्ड्स म्हणजेच बांग्लादेशच्या तेजगांव आणि कुर्मीटोला एयरबेसवरही हल्ला केला.

Indian Air Force Day
Air Force : नजर ना लगे ! भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन; राजनाथ सिंहांनी रक्षणासाठी बांधला पवित्र धागा

14 दिवस सुरु असलेल्या या युद्धानंतर भारतीय वायुसेनेला अनेक वीरता पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. वायुसेनेच्या जवानांना 1 परमवीर चक्र, 13 महावीर चक्र और 113 वीर चक्र मिळाले.

भारतीय वायुसेनेची ही कामगिरी सदैव अजरामर राहील. 1971 चे युद्ध असो की कोणतेही छोटे मोठे युद्ध असो वायुसेनेची कामगिरी नेहमीच देशासाठी एक अभिमानास्पद गोष्ट राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.