DGCA: अमेरिकेत विमानाचा हवेतच उघडला दरवाजा; भारतात DGCA अ‍ॅलर्टवर, काढले महत्वाचे आदेश

यासंदर्भात डीजीसीएनं सविस्तर पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
Alaska Airlines Boeing
Alaska Airlines Boeing
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेत अलास्का एअरलाईन्सच्या बोईंग 737-9 Max या विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचा दरवाजा अचानक उघडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर भारतातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) भारतीय विमान कंपन्यांना आपल्या विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात डीजीसीएनं सविस्तर पत्रक प्रसिद्ध केलं आहे. (Indian air operators asked to check Boeing 737-8 planes after Alaska Airlines mishap)

अलास्का एअरलाईन्सच्या विमानात काय घडलं?

अमेरिकेतील पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अलास्का एअरलाईन्सच्या बोईंग 737-9 MAX विमानानं उड्डाण केल्यानंतर त्याचा एक दरवाजा हवेत उडून गेला. एका प्रवाशाने या घटनेचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय की कॅबिनचा एक्झिट दरवाजा विमानापासून वेगळा झालेला आहे. नेमकं काय घडलंय हे तपासण्यासाठी आलेल्या केबिन क्रूला देखील क्षणभर काय घडलंय? हे कळलं नाही. (Latest Marathi News)

हे विमान पोर्टलँडवरुन कॅलिफॉर्नियातील ओनटारिओकडे निघाले होते, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर विमान परत पोर्टलँड आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर उतरवण्यात आलं. विमानामध्ये १७१ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर होते. अलास्का एअरलाईन्सकडून याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Alaska Airlines Boeing
Rohit Pawar: बच्चा म्हणणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, बच्चा है पर...

DGCA चे विमान कंपन्यांना आदेश

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर डीजीसीएनं भारतातील सर्व विमान कंपन्यांच्या ज्यांच्या ताफ्यात बोईंग कंपनीची विमानं आहेत. त्यांनी आपल्या विमानांची संपूर्ण तपासणी करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. पण भारतासाठी चांगली गोष्ट ही आहे की, भारतातील एकाही विमान कंपनीकडं अमेरिकेत ज्या विमानाबाबत दुर्घटना घडली ते बोईंग 737-9 Max सिरीजचं विमान नाही. तर बोईंग 737-8 Max ही विमानं आहेत. (Marathi Tajya Batmya)

DGCAनं निर्देश दिलेत की, भारतातील सर्व विमान कंपन्यांनी आपल्याकडील बोईंग 737 Max या विमानांच्या वन-टाइम इमर्जन्सी एक्झिटची तपासणी बंधनकारक आहे. ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ही सर्व तपासणी पूर्ण व्हायला पाहिजे, असे स्पष्ट आदेशच DGCAनं दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()