भारतीय सैन्य दलांमध्ये सव्वा लाख पदं रिक्त

संरक्षण राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
army 1.jpg
army 1.jpgEsakal
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या तीन संरक्षण दलांमध्ये 9,362 अधिकारी आणि सुमारे 1.13 लाख सैनिक, एअरमन आणि खलाशांची कमतरता जाणवत आहे, अशी माहिती सरकारने सोमवारी राज्यसभेत दिली. (Indian Armed Forces facing a shortage of officers) भारतीय हवाई दलात रिक्त अधिकाऱ्यांच्या पदांची संख्या 621 आहे, तर हवाई दलात 4, 850 पदे रिक्त आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी यावेळी दिली. (Minister of state for Defence Ajay Bhatt On Vacancy In Armed Forced)

army 1.jpg
भारतीय सैन्य दलात NCCच्या कॅडेट्ससाठी विशेष भरती

राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले की, सैन्य दलात 7,476 अधिकारी आणि 97,177 जवानांची कमतरता आहे ज्यात कनिष्ठ कमिशन्ड अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाकडे 1,265 अधिकारी आणि 11,166 खलाशांची कमतरता आहे. (Navy facing shortage of officers and sailors.) दरम्यान, "सशस्त्र दलातील रिक्त पदे नियोजनबद्ध आणि वेळेत भरण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या 53,569 अधिकारी आणि 11,35,799 सैनिक भारतीय लष्करात सेवा देत आहेत. नौदलात सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या 11,100 आहे तर खलाशांची संख्या 63,515 असल्याचे ते म्हणाले. तर, भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांची संख्या 12,048 इतकी असून एअरमनची संख्या 1,38,792 इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()