Heron Drone: दहशतवाद्यांना भरली इज्राईलच्या हेरॉन ड्रोनची धडकी, दहशतवाद्यांना शोधून खात्मा करण्यास सक्षम

हेरॉन मार्क-२ ड्रोन देखील आंतकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
Heron Drone: दहशतवाद्यांना भरली इज्राईलच्या हेरॉन ड्रोनची धडकी, दहशतवाद्यांना शोधून खात्मा करण्यास सक्षम
Updated on

Sharad Pawar : बबन घोलपांच्या मुलाने घेतली शरद पवारांची भेट; ठाकरे गटाच्या नाराज नेत्याला पवार बळ देणार का?


Anantnag Kasmhir:जम्मू-काश्मिरमधील अनंतनागमध्ये मागील सहा दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या ठिकाणी कमीत कमी दोन दहशतवादी लपल्याची दाट शक्यता आहे. आंतकवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सेनेची विशेष तुकडी शोध मोहीमेत उतरली आहे.

त्याशिवाय हेरॉन मार्क-२ ड्रोन देखील आंतकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. जंगलामध्ये गोळीबार देखील होत आहे. त्या ठिकाणी भारतीय सेना ड्रोनच्या माध्यमातून बॉम्ब खाली पाडत आहे. शनिवारी सुरक्षा दलांनी एका आतंकवाद्याला कंठस्नान घातलं.

काश्मिर खोऱ्यात अशांतता पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा भारतीय सुरक्षा दलांचा मानस आहे. त्यामुळे जमिनीपासून हवेपर्यंत मोहीम सुरु आहे. सध्या अनंतनागमधील कोकरनाग या ठिकाणी दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. हा भाग अतिशय उंचावर आहे. चारही बाजूंनी डोंगर, गुहा आणि दाट झाडी आहे. या गोष्टींचा फायदा घेत आतंकवादी आतापर्यंत वाचत आहे.

अत्याधुनिक हेरॉन मार्क-२

भारतीय सेनेने आतंकवाद्यांविरोधात मैदानात हेरॉन मार्क-२ हे अटॅक ड्रोन उतरवलं आहे. याच ड्रोनच्या मदतीने एका आतंकवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं. एका प्रकारे आपण म्हणू शकतो की दहशतवाद्यांना शोधून मारण्यात हे ड्रोन सक्षम आहे. या ड्रोनचं वैशिष्ट्य असं आहे की, हे रात्रीच्या वेळी देखील चोखपणे काम करु शकतं.

तसेच हे ड्रोन १५ किलोमीटर लांब बसून ऑपरेट करता येऊ शकतं. या ड्रोनमध्ये एकाच वेळी पाच दिशेला गोळ्या चालण्याची क्षमता आहे. या ड्रोनची निर्मीती इज्राईलमधील एअरोस्पेस इंडस्ट्रीजने तयार केलंय. शनिवारी याचं ड्रोनच्या मदतीने एका दहशतवाद्याला यमसदनी धाडण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

Heron Drone: दहशतवाद्यांना भरली इज्राईलच्या हेरॉन ड्रोनची धडकी, दहशतवाद्यांना शोधून खात्मा करण्यास सक्षम
IND Vs SL Final : भारताने आशियाकपवर आठव्यांदा कोरलं नाव

दहशतावाद्यांविरोधात काल रात्री कारवाई थांबवण्यात आली होती.मात्र, ड्रोन आपलं काम करत होते. ड्रोनच्या फुटेजमध्ये दहशतवादी ज्या ठिकाणी लपलेले आहेत ते ठिकाण दिसले आहे. लष्कराचे म्हणणे आहे की अतिरेकी खोल गुहांमध्ये लपले असून त्यांनी ते लपलेले ठिकाण लाकडाने झाकलंय. त्यामुळे ते जास्त काळ जगू शकत नाहीत. या चकमकीत तीन अधिकारी आणि एक जवान शहीद झाला.

ही कारवाई लवकरच संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. दुसरीकडे एलओसीजवळ उरी आणि हातलंगा येथे शनिवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. येथे दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले मात्र पाकिस्तानी चौकीतून गोळीबार झाल्यामुळे एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला नाही. पाकिस्तानी लष्कर या दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. (Latest Marathi News)

Heron Drone: दहशतवाद्यांना भरली इज्राईलच्या हेरॉन ड्रोनची धडकी, दहशतवाद्यांना शोधून खात्मा करण्यास सक्षम
Sharad Pawar : बबन घोलपांच्या मुलाने घेतली शरद पवारांची भेट; ठाकरे गटाच्या नाराज नेत्याला पवार बळ देणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.