नवी दिल्ली- ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता भारतीय जवान आपले कर्तव्य बजावत असतात. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी सुरु आहे. अशावेळी भारतीय जवानांनी एका गरोदर पहिलेचा जीव वाचवला आहे. कुपवारा येथील शुक्रवारची ही घटना असून यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.(Indian Army Jawans Safely Evacuate Pregnant Woman In Kupwara Amid Heavy Snowfall video)
विलहान आर्मी कॅम्पच्या जवानांना एक एमरजेन्सी कॉल रात्री अकरा वाजताच्या सुमारास आला होता. यात सांगण्यात आलं होतं की, एका गरोदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे. बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद पडले होते. अशा परिस्थितीत जवानांनी तिथे जाऊन गरोदर महिलेला वाचवण्याचे काम केले आहे.
कंबल आणि पीएचसी विलगाम दरम्यानचा रस्ता बर्फाने आच्छादलेला होता. गेल्या दोन दिवसांपासून हीच परिस्थिती होती. फोन कॉल येताच जवानांनी त्वरीत हालचाली केल्या आणि कठीण परिस्थितीत महिलेला वाचवलं. महिला आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जवानांनी दाखवलेली ही तत्परता, त्यांचे धैर्य आणि दुसऱ्यांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची तयारी यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. म्हणूनच सर्व देशवासियांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.