'अभिनंदन' यांचा असाही शूरपणा...

Abhinandan Varthaman
Abhinandan Varthaman
Updated on

पाकिस्तानाच्या भूमीत मिग-21 हे विमान कोसळल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी नागिरकांनी त्यांना दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. पण... लष्करी नियमानुसार अभिनंदन यांच्या हातामध्ये पिस्तूल असतानाही त्यांनी मारहाण सहन केली. पण, सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला नाही. जीव धोक्यात असतानाही सर्व सामान्य नागरिकांना धक्का लावायचा नाही.. भारतीय लष्कराची ही शिकवण. अभिनंदन यांचा शूरपणा... भारतासह पाकिस्तानी नागरिकांना अनुभवायला मिळाला.

पाकिस्तानमधील होर्रा गावात विमान पडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी 58 वर्षीय मोहम्मद रझाक चौधरी यांनीच ही माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांना दिली. चौधरी यांनी अभिनंदन यांचा जीव वाचल्यामुळे देवाचे आभार मानले आहेत. भारतीय वैमानिकाचा हा शूरपणा शत्रूराष्ट्रातील नागरिकानेच प्रसारमाध्यमांसमोर कथन केला आहे, यापेक्षा अजून काय हवे.

एलओसीपासून सात किलोमीटर अंतरावर होर्रा हे गाव. बुधवारी (ता. 27) सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने विंग कमांडर अभिनंदन हे सुखरूप बचावले. पाकिस्तानी नागिरकांनी विमान पडल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. भारतीय वैमानिक असल्याचे समजल्यानंतर दगडाने, हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. वर्धमान हे पाणी... पाणी... करत असताना हे मारहाण करण्यात मग्न होते. अभिनंदन यांच्या हातात पिस्तूल होते. पाकिस्तानी सर्व सामान्य नागरिकांवर ते न रोखता हवेत गोळीबार केला. पण, कोणत्याही सर्वसामान्य नागरिकावर त्यांनी रोखले नाही. जीव धोक्यात असताना, कोणत्याही क्षणी जीव जाण्याची भिती असतानाही व रक्ताबंबाळ अवस्था झालेली असतानाही त्यांनी पिस्तूलातून नागरिकांवर गोळीबार केला नाही. अभिनंदन यांचा हा केवढा मोठा शूरपणा.... पाकिस्तानी नागरिकांनाच हा शूरपणा अनुभवायला मिळाला.

पाकिस्तानी नागरिकांच्या तावडीतून अभिनंदन यांची सैनिकांनी सैनिकांनी सुटका करून सुरक्षितस्थळी हलवले. दरम्यानच्या काळातील त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्यानंतरही त्यांनी लष्करी नियमानुसारच प्रश्नांची उत्तरे बेधडकपणे दिली. पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेला अभिनंदन यांचा व्हिडिओ पाहून पाकिस्तानी नागरिक सुद्धा त्यांच्या प्रेमात पडले. अभिनंदन यांची सुखरूप सुटका करा, अशी मागणी पाकिस्तानी नागिरकच करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. पाकिस्तानी लेखक लेख लिहून अभिनंदन यांची लवकर सुटका करा म्हणून सांगत आहेत.

अभिनंदन यांच्या पकडण्यामुळे जवान चंदू चव्हाण यांचीही आठवण देशाला झाली. जवान चंदू चव्हाण यांच्या हातातही एके-47 होती. पण, पाकिस्तानी नागरिकांवर त्यांनी रोखली नाही. भारतीय लष्करी नियमानुसार आपले जवान, वैमानिक हे सर्वसामान्य नागिरकांशी शत्रूत्व नसल्याचे दाखवून देतात. जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानने 3 महिने 21 दिवसानंतर सुटका केली होती. पण, जिनेव्हा करारनुसार अभिनंदन यांची 8 दिवसात सुटका करणे गरजेचे आहे. जगातील नागरिकांचे अभिनंदन यांच्या सुटकेकडे लक्ष लागले आहे.

अभिनंदन यांचे नाव दोन दिवसापर्यंत फारसे कोणाला माहित नव्हते. पण, एका दिवसातच ते देशाच्या काना-कोपऱयात जाऊन पोहचले. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने ट्रेण्ड सुरू झाला आहे. आमचे शूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या पाठिशी संपूर्ण देश उभा राहिला आहे. अभिनंदन हे उद्या भारतात परतणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानने आज केली आहे. शूर अभिनंदन यांचे मायभूमीत स्वागत करण्यासाठी जरूर प्रतिक्रिया मांडा...
जय हिंद...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.