उजव्या पायात अंगठी तर डाव्या पायावर प्लास्टिकची रिंग; जैसलमेर सीमेवर संशयास्पद पक्ष्याची फडफड

सध्या भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. सतत जम्मू-काश्मिरमध्ये हल्लेही घडताहेत.
Jaisalmer Border
Jaisalmer Borderesakal
Updated on
Summary

सध्या भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. सतत जम्मू-काश्मिरमध्ये हल्लेही घडताहेत.

सध्या भारतावर दहशतवादी हल्ल्याचं (Terrorist Attack) सावट आहे. सतत जम्मू-काश्मिरमध्ये हल्लेही घडताहेत. मात्र, असं असताना आज सीमा सुरक्षा दलानं (BSF) जैसलमेर सीमेजवळील (Jaisalmer Border) भागात एका संशयास्पद पक्ष्याला (Bird) पकडलं आहे.

Jaisalmer Border
Mayawati : काँग्रेसला वाईट काळातच दलितांची का आठवण येते, हेच का त्यांचं खरं प्रेम? मायावतींचा थेट सवाल

आज (गुरुवार) ही घटना घडली असून या पक्ष्याला टॅग केलं असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पक्ष्याच्या उजव्या पायात एक अंगठी दिसते, ज्यावर काही संख्या आणि अक्षरं लिहिलेली आहेत. मात्र, बीएसएफनं या प्रकरणाचा तपशील अद्याप जारी केलेला नाहीय. या वर्षी जूनच्या सुरुवातीला एक स्थलांतरित पक्षी बारमेर आणि जैसलमेरला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेला होता.

गावकऱ्यांनी विष्णू की धानी गावाजवळ एशियाटिक हुबारा पक्षी पकडला आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 87 बटालियनकडं सोपवला. त्या पक्ष्याच्या उजव्या पायात अॅल्युमिनियमच्या एका अंगठी व्यतिरिक्त दोन अंगठ्याही असल्याचं कळलं. डाव्या पायावर हिरवी प्लास्टिकची रिंग होती. रिंगांवर काही खुणा, कथित संख्या आढळल्या असून त्याच्या पंजामध्ये एक टॅग देखील आहे. त्यावर ‘संयुक्त अरब अमिराती’ (United Arab Emirates) असं लिहिलं आहे. हा पक्षी हेर होता की नाही याबाबतचा तपास सुरु आहे.

Jaisalmer Border
'Mission Life' लाँच करून मोदींनी दिला पर्यावरणासोबत जगण्याचा 'मंत्र'; जाणून घ्या भाषणातील 10 मुद्दे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.