Research Vessel: वैज्ञानिकांसह ३६ जण असलेलं जहाज समुद्रात भरकटलं; बचावासाठी कोस्टगार्डनं लावली बाजी

भारतासाठी हे जहाज महत्त्वाचे आहे
Research Vessel of india
Research Vessel of india
Updated on

Research Vessel: तांत्रिक अडचणींमुळे गोवा आणि कारवार दरम्यान अडकलेल्या भारत सरकारच्या संशोधन जहाजाची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली. जहाजात एकूण ३६ लोक होते.

२८ क्रू सदस्य, ८ वैज्ञानिक या जहाजात होते. या सर्व सदस्यांना आता सुरक्षित गोव्याच्या दिशेने आणले जात आहे. कोस्ट गार्ड डीआयजी केएल अरुण यांनी ही माहिती दिली.

हे जहाज महत्वाचे होते. भारत सरकारचे हे संशोधन जहाज आहे. काल दुपारी ३ च्या सुमारास या जहाजात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. म्हणून आम्ही लगेच आमचे जहाज पाठवले. सायंकाळी ५ वाजता आमचे जहाज पोहोचले. ही एक अतिशय महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे कारण ते एक संशोधन जहाज आहे, असे एल अरुण यांनी सांगितले. 

तटरक्षक दलाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'सिंधू साधना' हे संशोधन जहाज इंजिनमध्ये बिघाड झाल्याने निकामी झाले होते, हे जहाज समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने ३ नॉट्स वेगाने वाहत होते. (latest marathi news)

Research Vessel of india
Kolhapur Rain Update: कोल्हापूरकरांना दिलासा! पुराच्या भीतीमुळे स्थलांतरित झालेल्यांना घरी जाण्याच्या सूचना

२६ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास कोस्ट गार्ड मुख्यालय, गोवा यांना संकटाचा फोन आला तेव्हा जहाज जमिनीपासून सुमारे २० समुद्री मैलांवर होते. कॉल मिळाल्यावर, भारतीय तटरक्षक दल ताबडतोब दखल घेत बचाव कार्य सक्रिय केले. भारत सरकारच्या संशोधन जहाजाच्या सुटकेसाठी पहिले जहाज सायंकाळी ५ वाजता आणि दुसरे जहाज रात्री पोहोचले.

Research Vessel of india
INS Vikrant: विमानवाहू युद्धनौकेवर १९ वर्षीय जवान आढळला मृतावस्थेत; आत्महत्येचा संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.