चीनी कम्युनिस्ट पक्षाची शंभरी; कार्यक्रमात भारतातील डाव्या पक्षांची उपस्थिती

चीनी कम्युनिस्ट पक्षाची शंभरी; कार्यक्रमात भारतातील डाव्या पक्षांची उपस्थिती
Updated on

नवी दिल्ली : चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे चीनमध्ये मोठा जंगी कार्यक्रम घेण्यात आला होता. सध्या या कम्युनिस्ट पक्षाची शंभरी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन पार पाडली जात आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात डाव्या पक्षांनी आणि डीएमकेच्या काही खासदारांनी भाग घेतला. हे लोक दिल्लीमधील चीनी दुतावासामध्ये उपस्थित होते, जिथे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चीनी कम्युनिस्ट पक्षाची शंभरी; कार्यक्रमात भारतातील डाव्या पक्षांची उपस्थिती
Goa Rape Case: 'मुली रात्रभर बीचवर कशासाठी?' मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाने खळबळ

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हे खासदार मंगळवारी या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात जे लोक सहभागी होते, त्यामध्ये सीपीएमचे महासचिव सीताराम येच्यूरी, सीपीआयचे जनरल सेक्रेटरी डी राजा, लोकसभा खासदार डॉ. एस. सेंथिलकुमार देखील सामील होते. याशिवाय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे जी. देवराजन देखील उपस्थित होते.

चीनी कम्युनिस्ट पक्षाची शंभरी; कार्यक्रमात भारतातील डाव्या पक्षांची उपस्थिती
अमेरिकेत त्सुनामीचा इशारा; अलास्कामध्ये ८.२ रिश्टर स्केलचा भूकंप

पक्षाची शंभरी अशी झाली साजरी

चिनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना होऊन गेल्या १ जुलै रोजी १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. या मुहुर्तावर चीनमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पक्षाचे महासचिव शी जिनपिंग उपस्थित होते. यावेळी चिनी सैन्याचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी शी जिनपिंग यांनी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या देशांना सज्जड दम देत ठेचण्याची भाषा केली. गेल्या १०० वर्षांच्या कार्यकाळात चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने अनेक चढउतार पाहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.