कोरोनामुळे झालेलं नुकसान भरुन काढायला लागणार 12 वर्षे; RBI चा अहवाल

भारताला कोरोना महामारीमध्ये तब्बल ५२ लाख कोटींचा तोटा झाला आहे
RBI
RBIesakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची कोरोनाच्या महामारीमुळे झालेली नुकसान भरुन काढण्यासाठी भारताना सुमारे एक दशकापेक्षा जास्त म्हणजे 12 वर्षे लागू शकतात असं रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या अहवालात सांगितलं आहे.

(Indian Economy May Take 12 Years Recoup Pandemic Losses : RBI Report)

मागच्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीला तोंड देत आहे. त्यादरम्यान जगातील प्रत्येक देशाला याचा फटका बसला असून भारताला या महामारीमध्ये तब्बल 52 लाख कोटींचा तोटा झाला आहे असं आरबीआयच्या अहवालात म्हटलं आहे. कोरोनाच्या वारंवार आलेल्या लाटेमुळे भारताच्या प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहे असं चलन आणि वित्त अहवाल 2021-22 मध्ये सांगितलं आहे.

RBI
महाराष्ट्रदिन विशेष : पाहा महाराष्ट्रातील अपरिचीत गडकिल्ले

2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे फटका बसला आणि त्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असताना लगेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला परत फटका बसला. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही असाच परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि इतर वस्तूंच्या वाढत्या भावामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय आला आणि देशांतर्गत महागाई अधिक तीव्र झाली असल्याची माहिती सांगितली आहे.

RBI
"कोण है आदित्य? वो टकलू, गंजा आदमी... असं म्हणणारे अयोध्येला निघालेत"

"2020-21 मध्ये विकास दरात 6.6 टक्यांनी घट झाली होती. त्यानंतर 2021-22 साठी 8.9 टक्के आणि 2022-23 साठी 7.2 टक्के आणि त्याहून अधिक 7.5 टक्के वाढ गृहीत धरल्यास, भारत कोरोना महामारीत झालेल्या नुकसानीवर 2034-35 या आर्थिक वर्षापर्यंत मात करेल अशी अपेक्षा आहे. आत्तापासून अंदाजे तब्बल 12 वर्षे लागतील." असं अहवालात म्हटले आहे. 2020-21, 2021-22 आणि 2022-23 साठी अनुक्रमे ₹ 19.1 लाख कोटी, ₹ 17.1 लाख कोटी आणि ₹ 16.4 लाख कोटी रुपयांचा तोटा भारतीय अर्थव्यवस्थेला झाला आहे. असं आरबीआयच्या अहवालात सांगितलं आहे.

RBI
आदित्य ठाकरे तिरुपती दर्शनाला; मुंबईतील मंदिरासंदर्भात दिलं पत्र

हा अहवाल आरबीआयच्या आर्थिक आणि धोरण संशोधन विभागातील (DEPR) अधिकाऱ्यांनी लिहिला असून, अहवालात व्यक्त केलेले निष्कर्ष पूर्णपणे योगदानकर्त्यांचे आहेत आणि ते मध्यवर्ती बँकेच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. असं स्पष्टीकरण आरबीआयने दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.