Nari Shakti : 'या' महिला वैज्ञानिकांनी रचला इतिहास; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वाढवली देशाची शान

आज अनेक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या पुढे एक झेप घेतली असल्याचे चित्र पहायला मिळते.
Nari Shakti : 'या' महिला वैज्ञानिकांनी रचला इतिहास; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वाढवली देशाची शान
Updated on
Summary

आज अनेक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या पुढे एक झेप घेतली असल्याचे चित्र पहायला मिळते.

सध्याच्या काळात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. सारं जग सध्या डिजिटल युगात हरवून गेलं आहे. या सगळ्यात महिलांनीही प्रचंड प्रगती केली आहे. एकेकाळी फक्त चुल आणि मुल सांभाळणाऱ्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. राजकीय, सांस्कृतिक, सामजिक, तांत्रिक, वैद्यकीय अशा सर्वच महत्वाच्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीन काम करताना दिसत आहेत. आणि ही अभिमानाची बाब आहे. (Independence Day 2022)

आज अनेक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या पुढे एक झेप घेतली असल्याचे चित्र पहायला मिळते. आज तुम्हाला भारतातील अशाच काही महिला वैज्ञानिकांसंदर्भातील माहिती सांगणार आहोत. ज्यांच्या कामगिरीने जगामध्ये देशाचे नाव उंचावले आहे. ज्यांनी जागतिक पातळीवर भारताला मान मिळवून दिला आहे. आजच्या काळात विज्ञानाने खूप प्रगती केली असून यामध्ये महिला शास्त्रज्ञांचेही मोठे योगदान आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कर्तबगार महिलांबद्दल...

Nari Shakti : 'या' महिला वैज्ञानिकांनी रचला इतिहास; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वाढवली देशाची शान
Raksha Bandhan : डेटिंग अ‍ॅप्सवरून पार्टनर शोधला नाही तर चक्क बहिणी शोधल्या, वाचा सविस्तर बातमी

आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई गोपाळराव जोशी या भारतातील पहिल्या महिला चिकित्सक (डॉक्टर) होत्या. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आनंदीबाईंचा विवाह झाला होता. आणि वयाच्या 14 व्या वर्षी आनंदीबाई आई झाल्या. पण औषधाअभावी त्यांचा मुलगा लहान वयातच मरण पावला. त्यानंतर त्यांनी औषधांवर संशोधन करण्याचा विचार केला. आनंदीबाईंचे पती त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. आनंदीबाईंच्या पतीने त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची प्रेरणा दिली होती. आनंदीबाईंनी पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. प्रतिकूल परिस्थिती असूनही आनंदीबाईंनी हार मानली नाही. (scientist women)

जानकी अम्मल

जानकी अम्मल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या. 1977 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. जानकी अम्मल यांनी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालक म्हणूनही काम केले आहे.

कमला सोहोनी

कमला सोहोनी या प्रोफेसर सी. व्ही रमण यांच्या पहिल्या महिला विद्यार्थिनी होत्या. पीएचडी केलेल्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हणूनही कमला सोहोनींचे नाव आजही घेतले जाते. त्यांनी प्रत्येक वनस्पतीच्या ऊतीमध्ये 'सायटोक्रोम सी' नावाचे एन्झाइम आढळते याचा शोध लावला होता.

Nari Shakti : 'या' महिला वैज्ञानिकांनी रचला इतिहास; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वाढवली देशाची शान
Raksha Bandhan : बहिणीला खुश करायचं आहे ना? मग 'या' आर्थिक भेटवस्तू द्या

असिमा चॅटर्जी

असिमा चॅटर्जी या त्यांच्या रसायनशास्त्रातील कामांसाठी खूप प्रसिद्ध होत्या. असिमा चॅटर्जी यांनी 1936 मध्ये कोलकाता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली होती. असीमा चॅटर्जी यांनी मिरगीविरोधी (अपस्माराचे झटके), आणि मलेरियाविरोधी औषधे विकसित केली. त्यादरम्यानच्या काळात चॅटर्जी या कर्करोगाशी संबंधित एका संशोधनातही सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.