भारतीय पिता-पुत्र अफगाणिस्तानमार्गे थेट पाकिस्तानमधील कराची येथे पोहोचले आहेत. या दोघांनीही कथितरीत्या धार्मिक अत्याचाराचा आरोप केला आहे आणि भारताविरुद्ध आरोप केले आहेत. तर पिता-पुत्र बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. हे दोघेही अफगाणिस्तान सीमेवरून भारतात पळाले आहेत. त्यांचे नवी दिल्लीत स्वतःचे घर आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
पाकिस्तान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७० वर्षीय मोहम्मद हसनैन आणि त्यांचा मुलगा इशाक अमीर यांनी बेकायदेशीरपणे पाकिस्तानात प्रवेश केला. या दोघांनी १४ दिवसांपूर्वी बलुचिस्तान प्रांतातील चमनमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आले. सध्या कराचीतील ईधी वेल्फेअर ट्रस्टच्या शेल्टर होममध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे.
मोहम्मद हसनैन म्हणाले, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल. आम्ही कायदेशीर कागदपत्रांशिवाय आलो असून आम्हाला आश्रय घ्यायचा आहे.
हसनैन आणि आमिरने सांगितले की ते नवी दिल्लीतील गौतमपुरी भागातील रहिवासी आहेत. याठिकाणी त्यांचे घर आहे. त्यांना दीर्घकाळ छळ आणि धार्मिक छळ सहन करावा लागला, याला कंटाळून त्यांनी देश सोडून पाकिस्तानात पळून जाण्याचा निर्णय घेतला.
या पिता पुत्रांना कराचीला पोहचायला १४ दिवस लागले. तिथे आम्ही पहिल्यांदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. दोघेही ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीहून दुबईला रवाना झाले, जिथे त्यांना अफगाणिस्तान दूतावासाकडून व्हिसा मिळाला. त्यानंतर ते काबूलला गेले. तेथून ते रस्त्याने कंदहारला गेले आणि तेथून चमन सीमेवरून पाकिस्तानात प्रवेश केला. (Latest Marathi News)
डॉनच्या वृत्तानुसार हसनैन म्हणाला, भारतात जर मुसलमानाला विरोध करताना पकडले. तर त्याचे घर बेकायदेशीरपणे बांधले आहे असे सांगून बुलडोझर चालवल्या जातो. देश सोडणारा मी पहिला माणूस नाही. माझ्या आधीही अनेकांनी देश सोडला. पण ते श्रीमंत होते आणि युरोप, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी किंवा कॅनडात परदेशी नागरिकत्व मिळवू शकले.माझ्याकडे पैशांची कमतरता होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.