Survey: भारतीय मुलं 13 व्या वर्षीच पाहताहेत पॉर्न, गंभीर परिणामांबाबत तज्ज्ञांनी केलं सावध

child porn addiction
child porn addictionsakal
Updated on

नवी दिल्ली- लहान वयातच मुलांच्या हाती मोबाईल येत आहे. त्यामुळे लहान वयापासूनच मुलं पॉर्नोग्राफी पाहत असल्याचं समोर येत आहे. भारतातील मुलं सरासरी १३ व्या वर्षीच पॉर्न पाहू लागल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सरकारकडून अनेक पॉर्न साईट ब्लॉक करण्यात आल्यात. तरीही मुलांपर्यंत असे व्हिडिओ पोहोचतच असल्याचं रिपोर्ट सांगतो.

लहान वयातच पॉर्नला आहारी गेल्याने त्याचे वाईट परिणाम मुलांवर पडू शकतात. एकलकोंड्या मुलांवर याचे जास्त परिणाम पाहायला मिळत असल्याचं 'टीओआय'चा रिपोर्ट सांगतो. कुटुंबामध्ये वादावादी, संवाद नाही अशा वातावरणातील मुलं पॉर्नच्या आहारी जाण्याचे प्रमाण जास्त आहे. घरातील वादाचे प्रसंग टाळण्यासाठी बेंगळुरुतील एक सात वर्षीय मुलगा पॉर्नच्या आहारी गेल्याचं उदाहरण आहे.

child porn addiction
High Court:खासगीत पॉर्न पाहणं गुन्हा नाही; हायकोर्टाचं स्पष्टीकरण

तज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांनी म्हटलं की, आपल्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधार म्हणून मुलं पॉर्नकडे पाहात आहेत. जास्त प्रमाणात पॉर्न पाहिल्याने त्याचे परिणाम मेंदुवर होतात.मेंदुमध्ये मोठ्या प्रमाणात डोपामाईन निर्माण होत राहते. कमी वयातच याची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाल्याने पुढील काळात याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो. समाधान न होण्याची शक्यता बळावते.

इंटरनेट आणि लैंगिक शिक्षण

मुलांना सहजपणे इंटरनेट मिळत आहे. त्यामुळे ते पॉर्न पाहण्यासाठी याचा उपयोग करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे लैंगिक शिक्षणाबाबत समाजाची असलेली उदासीनता. याबाबत मुलांना अवगत केल्यास, त्यांच्या मनात यासाठी कुतूहल टिकून राहणार नाही. कुतूहलापोटी अनेक मुलं पॉर्नकडे वळतात. त्यामुळे लैंगिक शिक्षणाचा समावेश शालेय शिक्षणात करावं असं तज्ज्ञांचं मत आहे.

child porn addiction
Ganesh Chaturthi 2023: रितेश-जेनिलियाची मुलं 'लई भारी'! 'रिसायकल बाप्पा' बनवत गायलेल्या आरतीने नेटकरीही थक्क

पॉर्नच्या जास्त आहारी केल्याने त्याचे परिणाम भावनिक आणि लैंगिक संबंधावर पडतात. आपल्या पार्टनरकडून नको त्या अपेक्षा केल्या जातात किंवा आपल्या पार्टनरला आपण सूख देऊ शकत नाही, असा न्यूनगंड मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पार्टनरसोबत लैंगिक संबंधांबाबत मनमोकळेपणाने बोलण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.