नोकरी सोडण्यात भारतीय आघाडीवर; ८६ टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा

Indian leads in quitting jobs 86 percent Of employees can resign in six months
Indian leads in quitting jobs 86 percent Of employees can resign in six monthsIndian leads in quitting jobs 86 percent Of employees can resign in six months
Updated on

नवी दिल्ली : भारतात (Indian) पुढील सहा महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी नोकरीचा राजीनामा (quitting jobs) देण्याची तयारी करीत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८६ टक्के कर्मचारी पुढील सहा महिन्यांत नोकरीचा राजीनामा देऊ इच्छित आहेत, असे रिक्रूटमेंट एजन्सी मायकल पेजच्या अहवालातून समोर आले आहे. कर्मचारी चांगल्या पगारासाठी व वर्क लाईफ बॅलन्ससाठी नोकरी सोडण्यास तयार असतात. (Indian leads in quitting jobs 86 percent Of employees can resign in six months)

अहवालानुसार, ६१ टक्के कर्मचारी असे आहेत ज्यांना कामाच्या आयुष्यात संतुलन राखण्यासाठी नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे. कोरोना महामारीनंतर नोकरीचा राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत त्याला आणखी वेग येईल. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा परिणाम सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि उद्योगांमध्ये दिसून येईल.

Indian leads in quitting jobs 86 percent Of employees can resign in six months
सुरजेवालांची जीभ घसरली; म्हणाले, सीता मातेचे जसे चीरहरण झाले...

पुढील काही महिन्यांत उत्कृष्ट प्रतिभेचे स्थलांतर होणार आहे. जे पुढेही वाढत जाईल. याशिवाय अनेक कार्यालयांमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याबाबत वाद सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर आवडले नाही. असे ११ टक्के कर्मचारी आता नोकरी सोडण्याच्या (quitting jobs) तयारीत आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

नोकरी सोडण्यात भारतीय आघाडीवर

करिअरची वाढ, कमी पगार, करिअरच्या भूमिकेत किंवा उद्योगातील बदल आणि कंपनीच्या दिशानिर्देशावर नाराज असल्यामुळे बहुतेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. १२ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय (employee) कर्मचारी नोकरी सोडण्यात आघाडीवर आहेत. भारतातील (Indian) बहुतेक कर्मचारी सहा महिन्यांत नोकरी सोडण्याचा विचार करीत आहेत. यानंतर इंडोनेशिया, फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड आणि आग्नेय आशियाचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी नोकरी सोडण्यास अधिक इच्छुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.