नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांनी ऍलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात चांगलाच गदारोळ माजला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली असून पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितले आहे. त्यानंतर आता रामदेव बाबा आक्रमक झाल्याचे दिसून आलंय. IMA ने थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून त्यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली खटला चालवण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे ऍलोपॅथीवरून सुरू झालेल्या वादावर रामदेव बाबा म्हणाले होते की, 'कुणाचा बापही रामदेवला अटक करू शकत नाही.' (Indian Medical Association IMA Uttarakhand has challenged Yog Guru Ramdev for a debate)
रामदेव बाबांनी डॉक्टरांना उद्देशून जवळपास २५ प्रश्नांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर आता उत्तराखंड आयएमएकडून हे आव्हान देण्यात आलं आहे. आता हे प्रकरण आणखी एका निर्णायक वळणावर आलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) बाबा रामदेव यांना आता अधिक तगडं आव्हान दिलं आहे. आयएमए उत्तराखंडने बाबा रामदेव यांना पतंजलीच्या औषधांनी ऍलोपॅथी हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंटबाबत वादविवादासाठी आव्हान दिलं आहे.
IMA ने त्यांना विचारलंय की कोणत्या ऍलोपॅथिक हॉस्पिटल्सनी उपचारांसाठी पतंजलीची औषधे दिली आहेत? यासंदर्भात IMA ने रामदेव बाबांना सार्वजनिक रित्या पॅनेल डिस्कशनसोबत चर्चेसाठी आव्हान दिलं आहे.
रामदेव बाबांनी एका टीव्ही डिबेट शो मध्ये दावा केला होता की, ऍलोपॅथिक हॉस्पिटल्स देखील कोरोनाच्या उपचारांसाठी पतंजलीच्या औषधांचा वापर करत आहेत. आता त्यावर IMA उत्तराखंडने रामदेव बाबांना आव्हान देत विचारलंय की, त्या हॉस्पिटल्सचं नाव सांगा, ज्याठिकाणी कोरोनाच्या उपचारांसाठी पतंजलीची औषधे दिली गेली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.