गुवाहाटी : आसाममधील तिनसुकियात शनिवारी धक्कादायक प्रकार घडला. येथील मिरानातील इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात स्क्रिनवर अचानक पाॅर्न चित्रपट सुरु झाला. बरं या वेळी उपस्थित कोण होत तर चक्क केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) आणि राज्याचे कामगार मंत्री संचय किसान. इंडियन ऑईलच्या (Indian Oil) मिथेनाॅल मिश्रीत एम १५ पेट्रोलच्या पायलट रोलआऊटची सुरुवात या प्रसंगी करण्यात येत होते. व्यासपीठावर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. इंडियन ऑईलचे अधिकारी भाषण करत होते. (Indian Oil Company Function Unwanted Film Screening Starts Before Union Minister)
स्क्रिनवर मिथेनाॅल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाचा व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. मात्र व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रिनवर एक पाॅर्न चित्रपट दिसू लागला आणि तोच उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. सदरील व्हिडिओ काही सेकंद सुरु होता. ऑपरेटरने ताबडतोब तो बंद केला. केंद्रीय मंत्री तेली म्हणाले.
मी इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याचे भाषण ऐकत होतो. त्यामुळे माझे लक्ष स्क्रिनकडे नव्हते. मात्र माझ्या पीएने घडलेला प्रकार मला सांगितला. प्रोजेक्टर ऑपरेटला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.