Indian Railways Blanket Hygiene : रेल्वेतील चादर,ब्लँकेट किती दिवसांतून धुतले जातात? RTI मधून समोर आली धक्कादायक माहिती

Indian Railways Blanket Cleaning Practices Exposed : भारतीय रेल्वेमधून प्रवास करताना एसी डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Railways' Blanket Cleaning Practices Exposed
Indian Railways' Blanket Cleaning Practices Exposedesakal
Updated on

Indian Railways Blankets Cleaning : भारतीय रेल्वेमधून प्रवास करताना एसी डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात? एका RTI अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार ब्लँकेट्स "कमीत कमी महिन्यातून एकदा आणि शक्य असल्यास दोनदा धुतली" जातात, परंतु हा निर्णय लॉजिस्टिकच्या सुविधांवर अवलंबून असतो.

रोज प्रवाशांची सेवा करणाऱ्या जवळपास २० ट्रेनमधील हाऊसकीपिंग स्टाफशी संवाद साधल्यावर असं आढळलं की, ब्लँकेट्स मासिक स्वरूपातच धुतली जातात. "जर ब्लँकेट्सवर वास येत असेल किंवा ती घाण झाली असेल तरच ती धुण्यासाठी पाठवली जातात," असं अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

रेल्वेच्या विविध गाड्यांमध्ये काम करणाऱ्या हाऊसकीपिंग स्टाफच्या मते, ब्लँकेट्सची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कोणतंही नियमित निरीक्षण नाही. "काही प्रसंगी, जर प्रवाशांनी तक्रार केली तरच आम्ही तत्काळ स्वच्छ ब्लँकेट देतो," असं एक कर्मचाऱ्याने सांगितलं.

Railways' Blanket Cleaning Practices Exposed
Whatsapp Chat Memory : व्हॉट्सॲप बनणार तुमचा पर्सनल असिस्टंट; ॲपमध्ये येतंय चॅट मेमरीचं खास फीचर, कसं वापरायचं? लगेच पाहा

माजी रेल्वे अधिकारी यांनी ब्लँकेट्सच्या वापरावरच प्रश्न उपस्थित केला आहे. "ब्लँकेट्स जड असतात आणि त्यांची योग्य साफसफाई करणे अवघड आहे. रेल्वेने यापुढे या ब्लँकेट्सचा वापर थांबवावा," असं त्यांचं मत आहे.

Railways' Blanket Cleaning Practices Exposed
Google Pixel 8 Discount : गुगल पिक्सेल 8 फोनवर मिळतोय चक्क 38 हजारचा डिस्काउंट; काय आहे खास ऑफर? कुठे खरेदी कराल बघा

सध्या भारतीय रेल्वेकडे ४६ विभागीय लॉन्ड्रीज आणि २५ BOOT लॉन्ड्रीज आहेत. विभागीय लॉन्ड्रीज म्हणजे रेल्वेची जमीन आणि यंत्रे, परंतु कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाते. BOOT लॉन्ड्रीजमध्ये मात्र उपकरणं आणि कर्मचाऱ्यांचा मालक खाजगी ठेकेदार असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.