Indian Railways Destination Alert : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशी बहुतांशवेळा रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. कारण रात्री वेळ कसा निघून जातो संमजत नाही. आणि झोप झाल्याने दिवस मोकळा मिळतो.
प्रवाशांच्या याच विचाराला अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेपण बऱ्याच सुधारणा करत असते. पुढील दोन वर्षात ट्रेन ४०० सेंमी अधिक वेगाने धावणार आहेत.
१५ ऑगस्ट २०२३ पासून ७५ अधिक शहरांशी रेल्वे जोडली जाणार आहे.
आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती नाही
आता रेल्वे आता वायफाय सुविधा सुरू करणार आहे. तर बहुतांश स्टेशन्सवर एस्कलेटर सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय आता रात्री कोणत्याही परिस्थितीत स्टेशन चुकू नये म्हणून एक खास सुविधा रेल्वे घेऊन येत आहे. पण यासाठी तुम्हाला ही सेवा विकत घ्यावी लागणार आहे.
प्रवासात नागरिकांना कोणताही ताण न घेता झोपता यावं म्हणून रेल्वेने ही सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या स्टेशनच्या बरोबर २० मिनीट आधी उठाल. या सुविधेमुळे तुम्ही शांततेत झोपू शकाल आणि तुमचं उतरण्याचं स्टेशनही चुकणार नाही. रेल्वेच्या या सुविधेचं नाव 'Destinetion Alert Wake up Alarm' (डेस्टीनेशन अलर्ट वेक अप अलार्म) असं आहे.
तक्रारींनंतर सुविधेची योजना
रेल्वे लेट झाली आणि त्यामुळे प्रवाशाला झोप लागली अन् उतरण्याचं स्टेशन चुकलं अशा तक्रारी रेल्वेकडे बऱ्याच आल्याने ही सुविधा करण्याची योजना करण्यात आली. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेल्वेचा चौकशी नंबर १३९ वरून घेता येईल.
२० मिनीट आधी वेक अप कॉल
ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी १३९ नंबरवर कॉ करून सेवेची विचारणा करावी. ही सुविधा रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत उपलब्ध असेल. या सेवेसाठी तुम्हाला तिकीटाव्यतिरीक्त अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.
कसा घ्यावा या सुविधेचा लाभ?
आयआरसीटीसीच्या डेस्टीनेशन अलर्ट वेक अप अलार्म साठी १३९ नंबरवर कॉल केल्यावर भाषा निवडावी. मग ७ आणि नंतर २ निवडावं. त्यानंतर १० आकडी PNR नंबर टाकावा आणि १ दाबून कंफर्मेशन द्यावं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.