नवी दिल्ली - शिक्षणक्षेत्रामध्ये (Education Field) आंतरराष्ट्रीय पातळीवर (International Level) देखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे. सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकींगने ‘जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२१/२२’ जारी केली असून त्यामध्ये दर्जाच्या बाबतीत देखील भारतीय विद्यापीठे (Indian University) आघाडीवर (Topper) असल्याचे दिसून आले आहे. या क्रमवारीमध्ये आयआयएम- अहमदाबादला ४१५ स्थान मिळाले असून त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएसी) ४५९ व्या स्थानी आहे. (Indian University World Education Organisation Quality Topper)
या संस्थांनाही स्थान
या क्रमवारीमध्ये झळकलेल्या अन्य संस्थांमध्ये जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी रूरकी, आयआयटी गुवाहाटी, एम्स नवी दिल्ली, जादवपूर आणि कोलकता विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे.
हे आहेत टॉपर
जागतिक पातळीवर हार्वर्ड विद्यापीठाने या क्रमवारीध्ये पहिले स्थान मिळवले असून त्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो.
देशातील दहा आघाडीच्या संस्था
क्रमवारीतील स्थान संस्था
४१५ आयआयएम अहमदाबाद
४५९ आयआयएससी, बंगळूर
५४३ टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई
५५७ आयआयटी मद्रास
५६७ आयआयटी, मुंबई
५७१ दिल्ली विद्यापीठ
६२३ आयआयटी दिल्ली
७०८ आयआयटी खरगपूर
७०९ पंजाब विद्यापीठ
८१८ आयआयटी कानपूर
पाहणीत
२००० - जगभरातील संस्थांचा समावेश
६८ - भारतीय संस्थांना स्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.