UPI Payment News : 'या' 10 देशांमध्ये राहणारे भारतीय आता करू शकणार UPI पेमेंट, जाणून घ्या डिटेल्स

Indians residents In These 10 Countries Can Now Make UPI Payments for fund transfer know details
Indians residents In These 10 Countries Can Now Make UPI Payments for fund transfer know details
Updated on

देशाबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता 10 देशांमधील अनिवासी भारतीय (NRI) आता भारतीय नंबर नसतानाही UPI पेमेंट करू शकतील. म्हणजेच आता त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरूनच UAPI पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे.

नेमक्या कोणत्या देशातील अनिवासी भारतीय लोकांना ही सुविधा मिळणार आहे, चला जाणून घेऊया..

NPCI काय म्हणाले..

एनपीसीआय (National Payments Corporation of India)चे म्हणणे आहे की यूपीआय प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहारांसाठी परदेशी लोकांना आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर वापरण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती.

हे पाहता NPCI ने 10 जानेवारी 2023 रोजी UPI सुविधा प्रदान करणाऱ्या बँका तसेच इतर भागीदारांना 30 एप्रिलपर्यंत याबद्दलची व्यवस्था करण्याचे निर्देष दिले आहेत. भविष्यात ही सुविधा इतर देशांनाही उपलब्ध होणार आहे.

Indians residents In These 10 Countries Can Now Make UPI Payments for fund transfer know details
NCP : राष्ट्रवादीच्या खासदाराला १० वर्षाची शिक्षा; खुनाच्या प्रयत्नाचा आहे आरोप, जाणून घ्या प्रकरण

त्यामुळे लवकरच देशाबाहेर राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना (NRI) आता आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवरून UPI ​​पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. या संदर्भात, NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इकोसिस्टममध्ये काही देशांतील वापरकर्त्यांना नॉन रेजिडेंट अकाउंट जसे की नॉन रेजिडेंट एक्सटर्नल (NRE) आणि नॉन-रेसिडेंट ऑर्डिनरी सारख्या आंतरराष्ट्रीय खात्यांसाठी UPI सुविधा वापरण्याची परवानगी दिली आहे. ज्यासाठी ते इंटरनॅशनल मोबाईल नंबर वापरू शकतील.

Indians residents In These 10 Countries Can Now Make UPI Payments for fund transfer know details
Viral Video : कोयता गँगची ऐसी तैसी! आता पुणेकरांनीच हातात घेतला दंडूका

या देशांमध्ये उपलब्ध होणार सुविधा

सुरुवातीला ही सुविधा या 10 देशांतील भारतीय प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या 10 देशांमध्ये सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि ब्रिटन यांचा समावेश आहे.

जिथे भारतीय NRI आणि भारतीय वंशाचे लोक (PIO) एनआरआय (NRI) बँक खाते उघडू शकतात. दुसरीकडे, भारताबाहेर राहणारी कोणतीही व्यक्ती रुपयांमध्ये व्यवहार करण्यासाठी एनआरओ (NRO Account) खाते उघडू शकते.

Indians residents In These 10 Countries Can Now Make UPI Payments for fund transfer know details
Natu Natu : भगवंत मान-केजरीवालांचा 'नाटू-नाटू' डान्स पाहून रामचरण-NTRला येईल चक्कर, Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.