Seema Haider : सीमा पाठोपाठ आता भारतीय महिलाही मित्रासाठी थेट पाकिस्तानात! मुलांना सोडून गाठलं लाहोर

Anju
Anju
Updated on

नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून भारतीय माध्यमांमध्ये सीमा हैदर हिची प्रेम कहाणी चांगलीच गाजत आहे. पाकिस्तानातील आपलं घर विकून सीमा हैदर ही सचिन नावाच्या तरुणाला भेटसाठी भारतात आली. शिवाय तिने सचिनसोबत लग्न करून हिंदू धर्म स्वीकारल्याचं सांगितलं. यावरून गदारोळ सुरू असतानाच आता भारतातील विवाहित महिलेने पाकिस्तानातील आपल्या मित्राला भेटण्यासाठी थेट लाहोर गाठल्याचं समोर आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

Anju
Mumbai-Pune Expressway : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

ज्याप्रमाणे पाकिस्तानमधील सीमा हैदरने तिच्या प्रियकराकडे भारतात येऊन लग्न केले, त्याचप्रमाणे राजस्थानमधील भिवडी औद्योगिक परिसरात काम करणारी महिला आपल्या दोन मुलांना सोडून लाहोरला पोहोचली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या माध्यमातून तिची पाकिस्तानमधील नसरुल्लाह नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. त्यानंतर अंजु दोन मुले आणि पतीला सोडून लाहोरला गेली आहे. (Marathi Tajya Batmya)

पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजु हिने पतीला फोन करून सांगितलं की आपण लाहोरमध्ये आहे. मी इथं मैत्रिणीला भेटण्यासाठी आली आहे, तीन-चार दिवसांत भारतात परतेल. याबाबतच वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर दोन मुलांची आई आपल्या मुलांना आणि पतीला सोडून पाकिस्तानात कशी पोहोचली, याबाबत भिवडीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील खरपुरा येथील रहिवासी अरविंद याची पत्नी अंजू तीन दिवसांपूर्वीच लाहोर येथे पोहोचली. आज तिने आपल्या मुलांशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. तेव्हाच पती अरविंद आणि त्याच्या कुटुंबाला अंजु लाहोरमध्ये गेल्याचं समजलं.

Anju
Dada Bhuse Latest News: आपले दुधाचे दातही पडले नाहीत, त्यामुळे...; दादा भुसेंची आदित्य ठाकरेंवर टीका

अंजुचं कुटुंब टपूकडा येथील इजीलेस सोसायटीत राहते. अरविंद २००५ पासून भिवाडीमध्ये नोकरीला आहे. अरविंद याचा विवाह २००७ मध्ये मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील अंजुसोबत झाला होता. अरविंदने सांगितलं की, अंजुने आपल्याला मैत्रीणीला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान अंजु पाकिस्तानात नसरुल्लाह नावाच्या व्यक्तीला भेटायला गेली याबाबत अरविंदला विचारले असता तिने या संदर्भात आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच अंजु PUBG खेळत नसल्याचंही त्याने सांगितलं. अंजूने आधीच पासपोर्ट बनवला होता. पासपोर्ट तिच्या जुन्या पत्त्यावरून बनवला आहे. दोन वर्षांपासून त्यांचे कुटुंब या सोसायटीत राहत आहे.

अंजू लाहोरला गेल्याची अरविंदला कल्पना नव्हती. अरविंदने सांगितलं की, अंजुने घरात पाकिस्तानचा उल्लेखही केला नव्हता. याआधी ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. एकदा फरिदाबादला तिच्या नातेवाईकाला भेटायला गेली होता. पण आता ती पाकिस्तानात असल्याचं ऐकलंय, यावर मी काय बोलू? पण मला आशा आहे की ती लवकरच येईल. तीन-चार दिवसांत भारतात येणार असल्याचे तिने सांगितले आहे.

अरविंदला १५ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे अंजूने पाकिस्तानला जाण्यासाठी नवीन सिम घेतले होते, ज्याचा नंबर तिने आपल्या पतीलाही दिला नव्हता. या माहितीनंतर स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून चौकशी करत आहेत. अंजुला व्हिसा कोणी तयार करून दिला. तसेच अंजुने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाशी मैत्री केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.