Indias First Voter : देशातील पहिल्या मतदाराचं निधन; श्याम नेगींनी 106 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1952 मध्ये देशात पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या.
Shyam Saran Negi Died
Shyam Saran Negi Diedesakal
Updated on
Summary

1952 मध्ये देशात पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या.

देशातील पहिले मतदार (Voter) श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi) यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) किन्नौर जिल्ह्यामधील (Kinnaur District) कल्पा इथं त्यांच्या घरी गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किन्नौरचे डीसी आबिद हुसैन यांनी नेगी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. नेगी 106 वर्षांचे होते आणि देशात पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत त्यांनी पहिलं मतदान केलं. मिळालेल्या माहितीनुसार, नेगी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. त्यामुळं नेगींनी हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी 2 नोव्हेंबर रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान केलं होतं. प्रथम मतदार श्याम नेगी यांच्या कानाचं दुखणं आणि डोळ्यांची दृष्टीही कमी झाली होती. 2 नोव्हेंबरला त्यांनी आयुष्यातील 34 व्यांदा मतदान केलं होतं.

Shyam Saran Negi Died
MP : बलात्काऱ्यांना भरचौकात फाशी द्या, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करू नका; भाजपा मंत्र्याचं विधान

2 नोव्हेंबरला मतदान केल्यानंतर देशातील पहिले मतदार श्याम नेगी यांनी सांगितलं होतं की, देशाला इंग्रजांपासून आणि राजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं आहे. आज लोकशाहीच्या या महान सणात प्रत्येक व्यक्तीला देशाचा विकास करणारी व्यक्ती निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. आज मी प्रकृती अस्वास्थ्यामुळं घरी बसून मतदान केलं. लोकशाहीच्या या महान उत्सवात सर्वांनी आपला सहभाग निश्चित करावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

Shyam Saran Negi Died
VIDEO : गोळीबारातून इम्रान वाचला याचं मला दुःख वाटतंय, हल्लेखोरानं दिली धक्कादायक कबुली

1952 मध्ये देशात पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. कारण, हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता होती. त्यामुळं सहा महिन्यांपूर्वी किन्नौरमध्ये मतदान झालं आणि नेगी यांनी पहिलं मतदान केलं. श्याम शरण नेगी वयाच्या 10 व्या वर्षी शाळेत गेले आणि त्यांनी कल्पामध्ये पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते रामपूरला गेले. 1940 ते 1946 पर्यंत त्यांनी वनविभागात वनरक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर ते शिक्षण विभागात गेले. नेगी यांचा जन्म 1917 मध्ये झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.