नवी दिल्ली : देशातील एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत ६.७ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आले असून, सरकारने खर्चात केलेली कपात आणि ग्राहकखर्च कमी झाल्यामुळे ‘जीडीपी’ वाढ मंदावली असून, कृषी क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे एकूण देशांतर्गत उत्पादनात घट झाली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. ही गेल्या पाच तिमाहींमधील सर्वात निराशाजनक कामगिरी ठरली आहे.