भारतातील कोरोना रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी घट; मात्र...

भारतातील कोरोना रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी घट; मात्र...
Updated on

न्यूयॉर्क : गेल्या आठवड्याच्या तुलनेत भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आज दिली. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी जगाच्या तुलनेत ती अद्यापही प्रचंड असल्याचा इशाराही ‘डब्लूएचओ’ने दिला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्याही गेल्या काही आठवड्यांपासून घटत आहे.

भारतातील कोरोना रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी घट; मात्र...
पुण्यातील भावाला थेट एलॉन मस्कचा रिप्लाय; ट्विटरवर दिलं प्रश्नाचं उत्तर

जागतिक रुग्णसंख्येत भारताचा वाटा मोठा असल्याने येथील रुग्णसंख्येच्या प्रमाणाचा जागतिक आकडेवारीवर परिणाम होतो. गेल्या आठवड्यात जगभरात ४८ लाख नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ८६ हजार जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत या दोन्ही संख्यांमध्ये अनुक्रमे १२ आणि ५ टक्के घट झाली असल्याचे ‘डब्लूएचओ’ने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात भारतात २३ लाख ८७ हजार ६६३ कोरोनाबाधित आढळले. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या १३ टक्क्यांनी कमी आहे. त्याही आधीच्या आठवड्यात भारतात ५ टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली होती.

जागतिक पातळीवर रुग्णसंख्या घटत असली तरी ती अद्यापही चिंताजनक पातळीवरच आहे. पॅसिफिक प्रदेशातील काही देश वगळले तर बहुतेक ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे. सर्वाधिक घट युरोपातील देशांमध्ये झाली आहे. युरोपात मृत्यू संख्याही वेगाने घटली आहे.

भारतातील कोरोना रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी घट; मात्र...
कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण

देश : बाधित : घट/वाढ

(९ ते १६ मे)

  • भारत : २३,८७,६६३ : - १३ टक्के

  • ब्राझील : ४,३७,०७६ : + ३ टक्के

  • अमेरिका : २,३५,६३८ : - २१ टक्के

  • अर्जेंटीना : १,५१,३३२ : + ८ टक्के

  • कोलंबिया : १,१५,८३४ : + ६ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.