विमानसेवा पुरवणाऱ्या 'इंडिगो' कंपनीची बंपर कमाई; पाहा किती आहे उत्पन्न

ह्याच कंपनीला मागच्या आर्थिक वर्षातील याच टप्प्यात ६२० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
indigo
indigoesakal
Updated on

नवी दिल्ली : भारतातील नामवंत विमानसेवा देणाऱ्या 'इंडिगो' कंपनीला या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत तब्बल १२९.८ कोटी रुपयांचा भरघोस नफा झाल्याचं शुक्रवारी आहवालातून समोर आलंय. इंटरग्लोब नावाची कंपनी आहे जी सध्या भारताता इंडिगो नावाने विमानसेवा पुरवत आहे. ह्याच कंपनीला मागच्या आर्थिक वर्षातील याच टप्प्यात ६२० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. (Indigo Airlines Profit)

कंपनीचा मागच्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ९२९४.७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. यामध्ये दरवर्षी ८९.३ टक्क्यांनी वाढ होताना आपल्याला दिसत आहे. तसेच कंपनीने मागच्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत आपल्या प्रती शेअर्स मधून ३.३७ रुपये एवढी कमाई केली असल्याचं अहवालातून सांगण्यात आलंय.

indigo
बंदुकीच्या गोळ्यांचा सामना, दहशतवाद्यांचा खात्मा; मुख्यमंत्रिपदाचा असाही चेहरा

''मला कंपनीचा मागच्या तिमाहीचा नफ्याचा अहवाल सादर करु शकल्याचा आनंद वाटतं आहे. आमचं बिझनेस मॉडेल हे किती मजबूत आहे याचं हे प्रात्यक्षिक होतं असं म्हणायला हरकत नाही. कोरोनाच्या कठीण काळातही आमच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना चांगली सेवा दिली. ते आमच्या कंपनीचे आधारस्तंभ आहेत.'' इंटरग्लोब कंपनीचे CEO रोनोजॉय दत्त यांनी बोलताना सांगितलं.

डिसेंबर २०२१ पर्यंतच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न हे ९४८०.१ कोटी होते. हे उत्पन्न मागच्या वर्षीच्या याच तिमाहीतील उत्पन्नापेक्षा ८४.३ टक्क्याने वाढलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.