राहुल बजाज यांच्या नावावरून नाराज होत्या इंदिरा गांधी, वाचा काय होते कारण

राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
India Gandhi
India GandhiSakal
Updated on

नवी दिल्ली : बजाज समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी (दि.12) पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दरम्यान, राहुल बजाज यांच्या नावामुळे इंदिरा गांधी नाराज झाल्या होत्या. त्यांच्या या नाराजी मागे नेमके काय कारण होतं हे आपण बघणार आहोत. (Indira Gandhi Upset With Rahul Bajaj Name )

India Gandhi
राहुल बजाज यांना राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली

राहुल बजाज यांच्या वडिलांचे नाव कमलनयन बजाज (Kamalnayan Bajaj) आणि आईचे नाव सावित्री बजाज (Savitri Bajaj) होते. महात्मा गांधी राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांना त्यांचा पाचवा मुलगा मानत असे. तसेच जमनालाज बजाज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही चांगले मित्र होते. एवढेच नव्हे तर, कमलनयन बजाज आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.

India Gandhi
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

इंदिरा गांधींना मुलाचे नाव राहुल ठेवायचे होते

'बेस्ट स्टोरीज ऑफ इंडियन बिझनेस वर्ल्ड' (मंजुल पब्लिशिंग) या पुस्तकात प्रकाशित माहितीनुसार, कमलनयन बजाज यांच्या पहिल्या मुलासाठी 'राहुल' हे नाव खुद्द जवाहरलाल नेहरूं यांनीच निवडले होते. यानंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी नाराज झाल्या होत्या. कारण, इंदिराजींना त्यांच्या मुलाचे नाव राहुल ठेवण्याची इच्छा होती. पण, कालांतराने इंदिराजींच्या नातवाचे नाव राहुल गांधी ठेवण्यात आले. विशेष गोष्ट म्हणजे राहुल बजाज यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राजीव (राजीव बजाज) असे ठेवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()