Indor Woman Murder : भयंकर! आधी महिलेची निर्घृण हत्या; हात-पाय ऋषिकेशला तर...इंदूरमध्ये सापडले शरीराचे तुकडे, दोन राज्यात खळबळ

Indor Woman Murder : मध्य प्रदेशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणीची हत्या करून तिचे हात आणि पाय उज्जैन एक्सप्रेसने ऋषिकेशला पाठवण्यात आले तर उर्वरित भाग इंदूरहून जप्त करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Indor Woman Murder
Indor Woman MurderEsakal
Updated on

मध्य प्रदेशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातून उत्तराखंडमधील ऋषिकेशला पोहोचलेल्या रेल्वेची साफसफाई करत असताना सफाई कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकची पिशवी उघडल्याने त्यांना धक्काच बसला. एका पिशवीमध्ये तरूणीचे छिन्नविछिन्न झालेले हात-पाय आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. रेल्वे यार्डातील वॉशिंग लाइनमधील सफाई कर्मचाऱ्यांनी याबाबत जीआरपीला माहिती दिली.

तरूणीच्या मृतदेहाचे उर्वरित भाग मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सापडले आहेत. तरूणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव ट्रेनमध्ये पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकावर सोमवारी उज्जैन एक्स्प्रेसच्या बोगीत एका तरूणीचे छिन्नविछिन्न हात व पाय एका पिशवीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जीआरपीने तरूणीचे दोन हात आणि पाय ताब्यात घेतले. फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत.

जीआरपी ऋषिकेशच्या म्हणण्यानुसार, उज्जैन एक्स्प्रेस गेल्या रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास इंदूरहून सुटल्यानंतर योगनगरी ऋषिकेशला पोहोचली. येथील प्रवाशांना उतरवल्यानंतर ही गाडी स्थानकाच्या वॉशिंग यार्डमध्ये हलवण्यात आली होती.

Indor Woman Murder
D Purandeshwari: लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या डी पुरंदेश्वरी कोण? चंद्राबाबूंना गप्प करण्यासाठी भाजपची खेळी!

सोमवारी दुपारी सफाई कर्मचाऱ्यांना वॉशिंग लाईन क्रमांक नऊवर रेल्वेच्या एस-१ आणि एस-२ डब्यांमधील स्वच्छतागृहाजवळ प्लास्टिकची पिशवी पडलेली आढळली. त्यामधून खूप उग्र वास येत होता. सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने आरपीएफ आणि जीआरपीला माहिती दिली. यानंतर जीआरपीचे पथक घटनास्थळी पोहोचले. पिशवी उघडल्यावर पोलिसही हैराण झाले. त्यामध्ये एका तरूणीचे दोन हात आणि पाय कापलेले होते. तिच्या हातात बांगड्या होत्या. यावरून ती एका महिलेची असल्याचे उघड झाले आहे.

Indor Woman Murder
Kerala High Court: आई-वडीलांचं प्रेम वेगळं अन्...; मुलीला जीवनसाथी निवडण्यापासून कोणी रोखू शकत नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा

डेहराडूनहून आलेल्या फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने घेतले. त्याच्या हात-पायांचे नमुने घेऊन त्याचा डीएनएही जतन करण्यात आला होता. जीआरपी चौकीचे प्रभारी आनंद गिरी यांनी सांगितले की, ऋषिकेश आणि आसपासच्या स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात यश आलेले नाही.

पोलिसांनी हात-पाय ताब्यात घेतले आहेत, हे अवयवांची ओळख पटत नाही तोपर्यंत त्यांना एम्सच्या शवागारात ठेवले. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची अनेक पथकेही तयार करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करण्यात येत आहेत.

Indor Woman Murder
Amravati City: घोस्ट सिटी होणार राज्याची राजधानी, आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या भांडणात भकास होता विकास

तरूणीचा उर्वरित मृतदेह सापडला इंदूरमधून

जीआरपी पोलिस स्टेशनचे एसएचओ त्रिवेंद्र राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी इंदूर रेल्वे स्टेशनवर यार्डमध्ये उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनमध्ये एका तरूणीचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये आढळून आला होता. तरूणीच्या डोक्यापासून कंबरेपर्यंतचा भाग ट्रेनमध्ये ठेवलेल्या ट्रॉली बॅगमध्ये सापडला आणि कमरेच्या खाली असलेला शरीराचा भाग पोत्यात सापडला.

तरूणीच्या शरीरातून हात आणि पाय गायब होते. तरूणीचे वय अंदाजे 25 वर्षे आहे. प्रथमदर्शनी, ऋषिकेशमध्ये सापडलेल्या तरूणीचे हात आणि पाय हे इंदूरमध्ये सापडलेल्या तरूणीच्या शरीराचे उर्वरित भाग आहेत. फोटो जुळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.