इंदौर : इंदौर शहरात दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुक अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाच मतदारसंघ असलेल्या इंदूर शहरात भाजपची मक्तेदारी आहे.
विद्यमान स्थितीवर मतदार खुलेपणाने बोलत नसला तरी त्यांची 'मन की बात' काही 'औरच' असून ती येत्या 17 तारखेला मतपेटीत उमटेल हे सहजच लक्षात येते.
मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, लहान व्यापारी हे काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत आहे तर तरुण वर्गाला मोदींची भुरळ असली तरी त्यांना 'मामा' अर्थात मुख्यमंत्री शिवराज चौहान नको आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात उद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंदूरमध्ये 'रोड शो' होतो आहे. (Indore Legislative Assembly Election Businessmen along with common people support Congress bjp political)
मध्य प्रदेशची उपराजधान तसेच सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू असलेले इंदूर शहर समजले जाते इंदूर शहरात पाच विधानसभा मतदारसंघ आहे आज घडीला त्यापैकी चार आमदार भाजपचे तर एकमेव आमदार काँग्रेसचे आहेत.
या वेळच्या निवडणुकीबाबत मतदारांचा कौल घेतला असता त्यांच्या मनातील खरी बाब स्पष्टपणे समोर येत नाही असे असले तरी त्यांचा कल काँग्रेसकडे झुकलेला आहे
शहराचे मध्यवर्ती आणि व्यापारी पेठेचे केंद्रबिंदू असलेल्या राजवाडा या परिसरात असलेल्या लहान मोठे दुकानदार व्यापाऱ्यांचा कल काँग्रेसकडे आहे तर अमोल मोकळेपणाने तरुण मतदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोळ असल्याचे दिसले.
मात्र त्यांना राज्यात शिवराज चौहान नको आहेत. नोकरदार असलेल्यांना राज्यात भाजप असावी असे वाटते. काही मतदार हे आपले मत व्यक्त करत नसली तरी त्यांना शहरातच नव्हे तर राज्यातही बदल हवा आहे.
अठरा वर्ष आम्ही झेलले आता बस्स... अशी बोलकी प्रतिक्रिया बहुतांशी मतदार देतात त्यामुळे इंदौरकर बदलाच्या दिशेने जात आहे.
'बरदाश नहीं होता' ते 'फिर कमलनाथ...'
महाराष्ट्र प्रमाणित मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात लवकर भरतीचे घोटाळे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य रोजगार कृषी याबाबतही मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे.
'अब बरदाश नहीं होता... बढाये हात, फिर कमलनाथ' यासारखे स्लोगण मतदारांना आकर्षित करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.