Indore Temple Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात वाढ, आतापर्यंत 40 जणांनी गमवला जीव

इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरी वरील छत कोसळल्याची घटना घडली
Indore Temple Accident
Indore Temple AccidentEsakal
Updated on

मध्यप्रदेशमधील इंदूरच्या झुलेलाल मंदिरात काल रामनवमीच्या दिवशी भीषण अपघात झाला. विहिरीचे छत कोसळल्यामुळे अनेक भाविक विहिरीत पडले. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असुन बचाव पथकाला 17 ते 18 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर इंदूरमध्ये प्रत्येक मृताच्या घरच्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून दोन लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली तसेच मदतीचं आश्वासन देखील यावेळी दिलं आहे. यावेळी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा देखील उपस्थित होते. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Indore Temple Accident
Howrah Ram Navami Violence : ममता बॅनर्जी म्हणतात, भाजप जबाबदार; भाजप म्हणते प्रशासन दोषी

मध्य प्रदेशमधील इंदूरमधील पटेलनगर भागातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या उत्सवाच्या दरम्यान भाविकांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. मंदिरातील प्राचीन बावडीच्या छतावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी विहिरीवरील छत कोसळले आणि ही घटना घडली. आत्तापर्यंत या घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महिलांचाही समावेश आहे.

Indore Temple Accident
Karnataka Assembly Election : कर्नाटकमध्ये भाजपच्या रणनितीत बदल; नड्डांनी बोलािवली सरचिटणीसांची बैठक

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत माझी प्रार्थना, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.

Indore Temple Accident
Supreme Court: पशूंना माणसाप्रमाणं हक्क देण्याची मागणी; SCनं फेटाळली याचिका; म्हटलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.